Join us

साबणाने चेहरा धुताय? तज्ज्ञांचा सल्ला, तुमचा चेहरा कायमचा खराब होऊ शकतो, चमक होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 13:15 IST

Can we use soap on face: Facewash vs soap for skin: Best facewash for oily and pimple skin: Is it safe to apply soap on face daily: चेहऱ्यावर जमा झालेली धूळ आणि घाण साफ करण्यासाठी साबणाने चेहरा धुवावा का? त्याचा चेहऱ्यावर कसा परिणाम होतो पाहूया.

आपल्या प्रत्येकाला असे वाटते की, आपण सुंदर दिसावे. यासाठी आपण चेहऱ्यावर अनेक महागड्या उत्पादनांचा उपयोग करतो.(Is it safe to apply soap on face daily) चांगल्या त्वचेसाठी आपण दिवसभर त्याची काळजी घेतो. (Soap damage on face) त्वचेची काळजी घेण्यासाठी पहिली स्टेप्स म्हणजे त्याची स्वच्छता. त्वचा निरोगी आणि सुंदर दिसावी यासाठी आहारात देखील अनेक बदल करतो. (Can we use soap on face)अनेकदा आपण त्वचेसाठी महागडे उत्पादने वापरतो खरे पण चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर करतो. पण ही पद्धत खरंच योग्य आहे का? (How to avoid pimples naturally) चेहऱ्यावर जमा झालेली धूळ आणि घाण साफ करण्यासाठी साबणाने चेहरा धुवावा का? त्याचा चेहऱ्यावर कसा परिणाम होतो पाहूया. 

महागड्या बोटॉक्सची गरज नाही, कॉफीचा ‘हा’ उपाय चेहऱ्यावर आणतो ग्लो-वय करतो कमी काही दिवसात

त्वचारोग तज्ज्ञ निधी गुप्ता सांगतात की, साबणामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. जे चेहऱ्याच्या त्वचेसाठी फारसे चांगले नाही. चेहऱ्याची त्वचा ही अतिशय नाजूक आणि अतिसंवेदनशील असते. ज्यामुळे त्वचेवर साबण लावल्याने त्याचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि अधिक ओढलेली जाणवते. काही साबणांमध्ये रसायने आणि आम्ल असतात जे चेहऱ्याच्या त्वचेला नुकसान पोहचवतात. त्यासाठी चेहऱ्यावर साबणाऐवजी फेस क्लिंजिंगचा वापर करा. 

योग्य फेस क्लिंजिंग कसा निवडावा?

1. आपल्या त्वचेवर खूप जास्त मुरुमे-पिंपल्स असतील तर ते कमी करण्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड आधारित फेस वॉश किंवा क्लिंजिंग वापरावे. 

2. चेहऱ्यावर मुरुमांचे डाग असतील तर ते कमी करण्यासाठी नियासिनमाइड आधारित क्लिंजिंग वापरावे. 

3. पिग्मेंटेशनची समस्या असेल तर ग्लायकोलिक ॲसिड तर चेहऱ्यावर डाग असतील तर ट्रॅनेक्सॅमिक ॲसिड असणारे क्लिंजिंग वापरा. यामुळे आपली त्वचा सुधारण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी