Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर प्रचंड मुरुम-पिंपल्सचे फोड? आहारात करा ४ बदल, पिंपल्स होतील कमी लवकर

चेहऱ्यावर प्रचंड मुरुम-पिंपल्सचे फोड? आहारात करा ४ बदल, पिंपल्स होतील कमी लवकर

diet changes for clear skin: foods to avoid for acne: anti-acne food plan: चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी आहारात काय असायला हवे पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 17:47 IST2025-06-23T17:23:42+5:302025-06-23T17:47:32+5:30

diet changes for clear skin: foods to avoid for acne: anti-acne food plan: चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी आहारात काय असायला हवे पाहूया.

skin care tips reduce pimples naturally with food best diet for acne-prone skin how to clear pimples | चेहऱ्यावर प्रचंड मुरुम-पिंपल्सचे फोड? आहारात करा ४ बदल, पिंपल्स होतील कमी लवकर

चेहऱ्यावर प्रचंड मुरुम-पिंपल्सचे फोड? आहारात करा ४ बदल, पिंपल्स होतील कमी लवकर

आपला चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकाला वाटते. पण त्वचेच्या वाढत्या समस्यांमुळे आपल्याला वैताग येतो.(Skin Care Tips) चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, मुरुमे, फोड आणि त्वचा निस्तेज होणे यांसारख्या समस्या वाढतात. सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे चेहरा निस्तेज आणि कोरडा होतो. (anti-acne food plan) अशावेळी आपण त्वचेवर महागडे उत्पादने आणि उपचार घेतो परंतु, यामुळे त्वचेला फायदा होत नाही. (skin-friendly diet tips)
त्वचेला जितके बाहरेचे पोषण हवे असते तितकेच आतून देखील हवे असते. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ साक्षी लालवानी म्हणतात की, चेहरा स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण काही गोष्टी बदलल्या पाहिजे.(home remedies for pimples) पैसे खर्च न करता आपण त्वचेची काळजी घेऊ शकतो. त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी फेशियल प्रोडक्टस वापरण्याऐवजी आपण आहारात निरोगी पदार्थ खायला हवे.(nutrition tips for glowing skin) यामुळे आपले आतडे मजबूत होतात. तसेच त्वचा आतून डिटॉक्स होते. चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी आहारात काय असायला हवे पाहूया. 

लिंबाच्या रसात मिसळा ३ गोष्टी, डार्क सर्कल- टॅनिंग होईल कमी, त्वचेच्या समस्या गायब-दिसाल सुंदर...

1. आपल्याला त्वचेची काळजी घ्यायची असेल तर सल्फर हा चांगला पर्याय आहे. त्वचेला नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाय करण्यासाठी आणि कोलेजन करण्यास मदत करते. तसेच चेहऱ्यावर मुरुमे तयार होत नाही. यासाठी आहारात आपल्याला कोबी, कांदा, लसूण, कार्ले, मुळा, ब्रोकोली, हळद आणि अंड्यातील पिवळा भाग खायला हवा. 

2. झिंक आपल्या शरीरातील तेल आणि मुरुमे यांसारख्या समस्यांवर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हे पोषण तत्व त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्याचे काम करते. जे त्वचेवरील जळजळ शांत करण्यास मदत करते. आहारात भोपळ्याचा बिया, तीळ, ओट्स , काजू, मूगाची डाळ, मशरुम यांसारख्या पदार्थ खा. 


3. सेलेनियमच्या सेवनाने चेहरा चमकतो आणि लवकर बरा होतो. सूर्याच्या अतिनिल किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आपण आहारात सूर्यफुलाचा बिया, लाल तांदूळ, अंडी यांसारखे पदार्थ खा. 

4. ग्लायसीन रात्रीच्या वेळी त्वचेची दुरुस्ती करते. त्वचेवरील मुरुमांच्या खुणा बरे करण्यासाठी आणि सुरकुत्या घालवण्यासाठी आपण जिलेटन, चिया सीड्स आणि राजगिरी खाऊ शकता. 

 

Web Title: skin care tips reduce pimples naturally with food best diet for acne-prone skin how to clear pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.