सुंदर दिसण्यासाठी आपण त्वचेवर अनेक ब्युटी प्रोडक्टचा वापर करतो. अधिक सुंदर आणि नितळ दिसण्यासाठी महागडे क्रीम्स वापरतो. (Jaya Bachchan beauty secrets) परंतु, यामुळे त्वचा खराब होऊन अनेक समस्या निर्माण होतात. चेहऱ्यावर सतत केमिकल्सचा वापर केल्याने मुरुम, पुरळे, काळे डाग पडतात. याचा अतिवापर झाला तर चेहऱ्यावर वांग देखील येतात.(Smooth skin tips naturally) त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. चेहऱ्यावर जास्त प्रमाणात केमिकल्सचा वापर केल्याने त्वचेचा रंग देखील खराब होतो. यामुळे त्वचा अधिक खराब दिसू लागते. (Rock salt scrub for glowing skin)हल्ली सुंदर दिसण्यासाठी आपण त्वचेवर अनेक पैसे खर्च करतो.(Skincare secrets of Jaya and Shweta Bachchan) महागड्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल, ब्लीच किंवा इतर अनेक क्रीम्सचा वापर करतो. परंतु, चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी जया बच्चन यांनी लेकीसह नातीला सोपा उपाय सांगितला आहे.(How to get glowing skin using rock salt scrub) सतत केमिकल्सचा वापर केल्याने त्वचा खराब होते ज्यामुळे सुंदर दिसण्याऐवजी आपण अधिक कुरुप दिसू लागतो. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रीने जया बच्चन यांनी त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी आणि अडथळ्यांपासून मुक्त होण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. (Home remedies for smooth skin like celebrities)
झटपट केस गळती थांबवणारे स्वयंपाकघरातले ५ पदार्थ, केस गळणं थांबेल कसं या प्रश्नाचं उत्तर!
त्या म्हणतात की, मी आंघोळीनंतर माझ्या संपूर्ण हातावर मीठ चोळते. त्यांच्या मते शरीरावर मीठ चोळणे ही नैसर्गिक एक्लफोलिएटिंग आहे. ज्यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. मीठातील खजिना त्वचेला पोषण देतो. ज्यामुळे त्वचा गुळगुळीत, पुनरुज्जीवित होते, असा सल्ला त्यांनी लेकीसह नातीला दिला.
मिठामध्ये खनिजे, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. पाण्यात घालून आंघोळ केल्याने आपल्या दुखणाऱ्या स्नायूंना आराम मिळतो. परंतु, याचा खरखरीतपणा आपल्या त्वचेवर जळजळ, कोरडेपणा आणि पुरळे आणू शकतात. जर आपली त्वचा अतिसंवेदनशील असेल तर खराब होऊ शकते. याचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाईल. ज्यामुळे कोरडेपणा, लालसरपणा त्वचेला येईल. यामुळे आपली त्वचा अत्यंत कोरडी किंवा संवेदनशील , एक्झिमा, सोरायसिस किंवा कोणत्याही त्वचेची ऍलर्जी असल्यास मीठ किंवा त्याचा स्क्रब वापरु नका. तसेच वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या.