Lokmat Sakhi >Beauty > ब्लॅकहेड्समुळे नाक फार काळवंडलं? सारखी खाज सुटते ? करा हे खास घरगुती उपाय

ब्लॅकहेड्समुळे नाक फार काळवंडलं? सारखी खाज सुटते ? करा हे खास घरगुती उपाय

skin care tips, Is your nose getting dark because of blackheads? Does it itch? Try this special home remedy : घरीच करा ब्लॅकहेड्स कमी. अगदी सोपे उपाय. नक्की करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2025 13:08 IST2025-07-20T13:05:39+5:302025-07-20T13:08:08+5:30

skin care tips, Is your nose getting dark because of blackheads? Does it itch? Try this special home remedy : घरीच करा ब्लॅकहेड्स कमी. अगदी सोपे उपाय. नक्की करुन पाहा.

skin care tips, Is your nose getting dark because of blackheads? Does it itch? Try this special home remedy | ब्लॅकहेड्समुळे नाक फार काळवंडलं? सारखी खाज सुटते ? करा हे खास घरगुती उपाय

ब्लॅकहेड्समुळे नाक फार काळवंडलं? सारखी खाज सुटते ? करा हे खास घरगुती उपाय

नाकाजवळचे ब्लॅकहेड्स म्हणजे त्वचेवरील लहान काळसर डाग जे त्वचेतील छिद्रात साचलेल्या मळामुळे तयार होतात. फक्त मळच नाही तर त्वचेवरील तेलामुळे हे डाग वाढत जातात. (skin care tips, Is your nose getting dark because of blackheads? Does it itch? Try this special home remedy)त्यामधे तेल, मळ, माती सारेच असते. या ब्लॅकहेड्समुळे चेहरा निस्तेज आणि अस्वच्छ दिसू लागतो. यावर योग्य काळजी घेतल्यास आणि नियमित त्वचेची स्वच्छता केल्यास नाकाजवळील या ब्लकहेड्सचे प्रमाण कमी करता येते.

ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, चेहरा दररोज दोन वेळा सौम्य फेसवॉशने स्वच्छ धुणे आवश्यक असते. विशेषतः झोपण्यापूर्वी चेहरा नीट धुणे खूप महत्त्वाचे आहे. कारण दिवसभर त्वचेवर धूळ, प्रदूषण आणि तेलकटपणा यांचा मारा होत असतो. त्यामुळे रात्री झोपण्याआधी सारे साफ  करुन झोपा. कोमट पाण्याने चेहरा धुवा. तेलकटपणा आणि चिवट धूळ थंड पाण्याने पटकन निघत नाही. त्यासाठी कोमट पाणीच हवे. ज्यामुळे त्वचेतील छिद्रे उघडतात आणि त्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते.

दर आठवड्याला एकदा स्टीम घेणे हा देखील एक प्रभावी उपाय आहे. वाफ घेतल्याने त्वचेला उब मिळते आणि ब्लॅकहेड्स मोकळे होतात. ते मोकळे झाल्यावर ज्यामुळे नंतर हलक्या हाताने काढणे सोपे जाते. वाफ घेतल्यावर लगेच त्वचेवर स्क्रब लावणे फायदेशीर ठरते. स्क्रबमध्ये बारीक कण असलेले चांगले स्क्रब वापरा हे कण जे त्वचेला त्रास न देता, मृत पेशी दूर करू शकतात.

काही घरचे उपायही उपयुक्त ठरतात. जसे की मध आणि लिंबाचा रस मिसळून नाकावर लावल्यास त्वचेवरचे तेल नियंत्रणात राहते आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते. तसेच बेसन, हळद आणि दही यांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्यास ती त्वचेचे नैसर्गिक क्लिन्झिंग करते. हा एक फार प्रभावी पर्याय आहे. 

ब्लॅकहेड्स सतत काढण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे त्वचेवर ओरखडे किंवा डाग पडू शकतात. जर ब्लॅकहेड्स खूप प्रमाणात असतील, तर त्वचातज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. त्वचेची स्वच्छता राखणे, पुरेसे पाणी पिणे, आणि तेलकट, जंक फूड कमी खाणे हे सगळे उपाय करायचे म्हणजे फायदा होईल. त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी काही सवयी बदलणे गरजेचे असते. नियमित त्वचेची निगा राखल्यास नाकाजवळचे ब्लॅकहेड्स हळूहळू कमी होतात आणि त्वचा पुन्हा सुंदर दिसू लागते.

Web Title: skin care tips, Is your nose getting dark because of blackheads? Does it itch? Try this special home remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.