ऋतूमानानुसार आपल्या आरोग्यात बदल होताना दिसतात. त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. (skin care tips) उन्हाळा म्हटलं की, आरोग्यासह त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे त्वचा काळी पडू लागते. शरीरातील उष्णता वाढली की घाम येणे, त्वचेवर मुरुमे येणं यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. तर काहींना उन्हाच्या अतिनिल किरणांचा त्रास होतो. (Tanning removal face mask)
उन्हामुळे त्वचेवर काळे डाग पडतात, खाज येत व चेहरा देखील सूजतो. उन्हाळ्यात आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी त्वचेला तजलेदार करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. ज्यामुळे त्वचेवरील गेलेल तेज पुन्हा येण्यास मदत होईल. तसेच चेहऱ्यावर चमक येईल. (summer season skin care)
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपण चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो. परंतु, सनस्क्रीनमधील पीएच पातळी कमी असल्यास त्याचा त्वचेसाठी काही उपयोग होत नाही. यामुळे त्वचा उजळण्याऐवजी ती अधिकच काळी आणि निस्तेज दिसू शकते. यासाठी आपण काही घरगुती फेस पॅक झोपण्यापूर्वी लावल्यास फायदा होईल.
बेसन टॅनिंग मास्क बेसन हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. बेसनापासून बनवलेला हा मास्क टॅनिंग काढून टाकण्यासोबतच त्वचा उजळवण्यास मदत करेल. बेसन टॅनिंग रिमूव्हल मास्क केवळ चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करत नाही तर डाग, मुरुमे आणि तेलकट त्वचेपासून संरक्षण करण्यास मदत करतो. हा फेस मास्क घरी कसा बनवायचा? त्वचेवरील टॅनिंग कसे दूर करायचे? पाहूया.
बेसन फेस मास्क हा फेस मास्क बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी बेसन, दही आणि गुलाबजल एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करावी लागेल. हे फेस पॅक चेहऱ्याला लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ धुवा. टॅन झालेल्या त्वचेवर हा मास्क लावा. आपण हा मास्क हातपायावर देखील लावू शकतो. पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा मास्क वापरल्याने टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.