सुंदर दिसण्यासाठी कधी कोरिअन स्किन केअर तर कधी युट्यूब, रिल्समधली व्हिडीओचा वापर आपण आपल्या त्वचेसाठी करत असतो.(Bedtime skincare routine) अवघ्या १०-१५ मिनिटांत चेहरा होईल ग्लो किंवा सॉफ्ट असे अनेक व्हिडीओ रोज पाहातो.(Curd and coconut oil for glowing skin) परंतु, कितीही काही केले तरी चेहरा काही सुंदर दिसत नाही. पिंगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, मुरुमे, त्वचा कोरडी पडणे किंवा फुटणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (Overnight skincare tips)
ऋतूमानानुसार चेहऱ्यात देखील बदल होतात. कधी कोरडी तर कधी तेलकट तर कधी दोन्ही स्वरुपाची त्वचा आपल्याला पाहायला मिळते.(Natural face mask for glowing skin) त्वचा अधिक सुंदर आणि तुकतुकीत दिसण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनाचा वापर करतो.(Nourishing overnight face mask) अनेक सनस्क्रिन, फेशवॉश, मॉइश्चरायझर किंवा क्रीम्सचा वापर करतो. परंतु त्वचा उजळण्याऐवजी त्याचा रंग अधिक कमी होऊ लागतो किंवा पिंपल्स येऊ लागतात.
चाळिशीतही चेहरा दिसेल विशीतल्या तरुणीइतका तुकतुकीत; आहारात ‘हे’' ७ पदार्थ नक्की खा, चेहरा चमकेल
सध्या अनेकांना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. अशावेळी घराबाहेर पडताना प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि हानिकारक घटक त्वचेला नुकसान पोहचवतात. त्यामुळे अगदी कमी वयात त्वचा डल आणि अकाली वृद्धत्वाचे निशाण दिसू लागते. तसेच त्वचेच्या रंगात देखील बदल होतो. त्वचा चमकदार आणि त्यावरील डाग कमी करायचे असतील तर आपल्या त्वचेची रोज काळजी घ्यायला हवी. त्वचेला चमकदार बनवण्याऐवजी काही घरगुती उपाय केले तर फायदेशीर ठरेल.
आपल्या त्वचेसाठी नारळाचे तेल केव्ही चांगले! यामध्ये काही नैसर्गिक घटक घालून त्याचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने आपल्याला फायदा होतो. तसेच रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने त्वचा मऊ आणि ग्लोइंग होण्यास मदत होईल.
आता घरी झटपट बनवा तुपाचं मॉइश्चरायझर, त्वचा इतकी चमकेल की सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावतेस?
नारळाच्या तेलात अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे त्वचेला पोषण आणि हाडड्रेट करण्यास मदत करतात. आपण नारळाच्या तेलात बेसन, दही आणि हळद मिसळून चेहऱ्यावर लावू शकतो. यासाठी आपल्याला एका बाऊलमध्ये नारळाचे तेल घेऊन त्यात दही मिसळवावे लागेल. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. तेल त्वचेच चांगले शोषले जाईल इथंपर्यंत त्वचेला चांगला मसाज करा. चेहरा सकाळी स्वच्छ पाण्याने धुवा. असे रोज केल्याने काळवंडलेल्या त्वचेचा रंग बदलण्यास मदत होईल. त्वचेला नैसर्गिक चमक येऊन तेज मिळेल. तसेच त्वचेवरील डागही कमी होण्यास मदत होईल.