आपण शरीराच्या सर्व भागांकडे लक्ष देतो परंतु, काही भागांकडे दुर्लक्ष करतो. त्यापैकी मुख्य भाग म्हणजे हाताचे कोपरे, मान आणि गुडघे. (How to Lighten Dark Neck and Elbow Skin Naturally) आंघोळ करताना साबण लावून आपण व्यवस्थित स्वच्छ करतो. परंतु,घामामुळे मानेच्यावर थर जमा होतो. उन्हात गेल्यामुळे मानेची त्वचा, हाताचे कोपरे काळे पडू लागतात. (Home Remedies for Dark Neck and Elbow Skin)
मान आणि गळ्यावर पडलेले काळे डाग हे अतिशय विचित्र दिसतात. यामुळे आपल्या सौंदर्यात आणखी कमीपणा जाणवायला लागतो.(Effective Tips to Get Rid of Dark Neck and Hands) मान, गळा आणि हाताचे कोपरे स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादन किंवा पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करतो. जर आपल्यालाही मान स्वच्छ आणि चमकदार बनवायची असेल तर पार्लरमध्ये न जाता काही घरगुती उपाय करुन पाहा. (How to Remove Tan from Neck and Elbows at Home)
टाचा होतील मऊ-मुलायम, भेगाही भरुन निघतील; पाहा सोपे घरगुती उपाय, काळवंडलेले पायही गोरे होतील!!
1. कोरफड जेल
मानेवरील काळेपणा घालवायचा असेल तर कोरफडीच्या जेलचा वापर करा. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे काळवंडलेल्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. यासाठी आपल्या मानेवर ताज्या कोरफडीचा गर लावा आणि २० मिनिटे तसेच ठेवा. यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यास फरक जाणवेल.
2. बटाटा आणि लिंबूचा रस
मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाटा आणि लिंबाचा रस वापरु शकता. यासाठी बटाट्याच्या रसात लिंबाचा रस घाला. हा रस मानेवर नीट लावा. मानेवरील आणि हाताच्या कोपऱ्यांवरील काळपटपणा हलका करण्यास मदत करेल.
3. हळद आणि दुधाचा पॅक
हळद आणि दुधाचा पॅक तयार करण्यासाठी एक चमचा दुधात अर्धा चमचा हळद मिसळा. हा पॅक आपल्या मानेवर किंवा हाताच्या कोपऱ्यांवर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. सुकल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. काळ्या झालेल्या मानेसाठी हळद आणि दुधाचा हा पॅक खूप फायदेशीर आहे.
4. टोमॅटोची पेस्ट
टोमॅटोमध्ये अनेक गुणधर्म आढळतात जे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत करतात. टोमॅटोच्या पेस्टने मानेचा काळेपणा निघून जाण्यास मदत होईल. यासाठी किसलेल्या टोमॅटोमध्ये २ चमचे कच्चे दूध घालून चांगेल मिसळा. याची पेस्ट तयार करा आणि नंतर ती आपल्या मानेवर किंवा हाताच्या कोपऱ्यावर लावा. सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून तीनदा असे केल्याने आराम मिळेल.