Join us

फेशियल हेअर काढून टाकण्यासाठी भन्नाट घरगुती उपाय, चेहरा होईल स्वच्छ- चमकदार आणि दिसेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 18:09 IST

Beauty Tips For Removing Facial Hair Growth: फेशियल हेअरची ग्रोथ कमी करण्यासाठी हा घरगुती उपाय निश्चितच उपयुक्त ठरू शकतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हा उपाय (home remedies) करता येईल.

ठळक मुद्देव्हॅक्सप्रमाणे एका दिवसांत किंवा एका झटक्यात केस निश्चितच कमी होणार नाहीत. त्यामुळे काही आठवडे सलग करून बघा.

काही जणींच्या कपाळावर, गालावर, गळ्याच्या काही भागावर खूपच केस असतात. यामुळे मग रंग उजळ असूनही चेहरा मात्र  डल, काळवंडलेला दिसतो. हल्ली आपण ब्लीच करून हे केस सोनेरी रंगात रंगविण्याचा प्रयत्न करतो. पण साधारण ३  महिन्यांतून एकदाच ब्लीच करावं, असा सल्ला ब्यूटीशियन देतात. त्यामुळे मग चेहऱ्यावरच्या केसांसाठी काय करावं (Home remedies for removing facial hair), असा प्रश्न अनेकींना पडतो. त्यासाठीच हा बघा एक खास उपाय. काही दिवस नियमितपणे हा उपाय करा. व्हॅक्सप्रमाणे एका दिवसांत किंवा एका झटक्यात केस निश्चितच कमी होणार नाहीत. त्यामुळे काही आठवडे सलग करून बघा. त्यानंतर चांगला परिणाम दिसून येईल.(How to stop facial hair growth?)

 

फेशियल हेअर काढून टाकण्यासाठी उपाय१. हा घरगुती उपाय इन्स्टाग्रामच्या anubeauty.tips या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

२. प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगवेगळा असताे. त्यामुळे दुसऱ्यांना चालणारा उपाय आपल्या त्वचेवरही चालेलच, असं नाही. म्हणूनच हा उपाय तुमच्या त्वचेला सहन होतो की नाही, हे जाणून घेण्यासाठी एकदा पॅचटेस्ट करा. त्यानंतरच सगळ्या चेहऱ्यावर हा उपाय करून बघा.

लग्नसराईमध्ये भिकबाळी घ्यायची? बघा १० ट्रेण्डी- आकर्षक पर्याय, एक से एक मस्त डिझाईन्स

३. हा हेअर रिमुव्हल फेसपॅक बनविण्यासाठी आपल्याला २ टीस्पून कॉर्नस्टार्च, पाच टीस्पून हळद, अर्ध्या लिंबाचा रस आणि ४ टेबलस्पून पाणी लागणार आहे. हे साहित्य एका पातेल्यात घ्या आणि ते गरम करायला ठेवा. गरम करताना वारंवार हलवा. नंतर हे मिश्रण जेव्हा घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा.

 

४. मिश्रण थंड झाल्यावर तुमच्या चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटे ते चेहऱ्यावर सुकू द्या. त्यानंतर चोळून चोळून काढा. 

लोकरीचे कपडे वर्षानुवर्षे दिसतील नव्यासारखे, फक्त कपडे धुताना लक्षात ठेवा ४ गोष्टी

५. यानंतर चेहरा धुवा आणि मॉईश्चराईज करा. काही वेळा नियमितपणे उपाय केल्यास चेहऱ्यावरचे केस कमी- कमी होत जातील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी