Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर ऑफिसमध्ये AC मध्ये बसून तुम्हीच नाही तुमची त्वचाही म्हातारी होतेय? ३ गोष्टी रोज करा न विसरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2026 13:47 IST

Glowing Skin Tips: Daily Skin Hydration: पलं काम आणि AC दोन्ही सांभाळून त्वचेचा नैसर्गिक ग्लो कसा टिकवायचा, याचे ३ सोपे ब्युटी रूटीन आणि 'मॅजिक सिक्रेट्स' पाहूया.

सध्याच्या कॉर्पोरेट जगात ऑफिसमध्ये ८ ते ९ तास एअर कंडिशनिंगमध्ये बसणं ही गरज बनली आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यापासून एसी आपल्याला आराम देतो खरा, पण हाच थंडावा आपल्या त्वचेसाठी हळूहळू सायलंट किलर ठरतोय. (skin care tips) अनेक नोकरी करणाऱ्या महिला आणि पुरुषांची एकच तक्रार असते की सकाळी घरुन निघताना चेहरा फ्रेश दिसतो, पण ऑफिसमधून बाहेर पडताना त्वचा ओढल्यासारखी, कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. अगदी कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या दिसतात.(Glowing Skin Tips) डोळ्यांखालची त्वचा अचानक ओढल्यासारखी वाटते. याचं मुख्य कारण म्हणजे एसी हवेतील ओलावा शोषून घेतो. जेव्हा हवेत ओलावा नसतो, तेव्हा त्वचा स्वत:चा नैसर्गिक ओलावा गमावू लागते.(Dry Skin Solutions for Office) यामुळे त्वचा कोरडी ड्राय होत नाही, तर अकाली सुरकुत्या येते, डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडणे आणि त्वचा म्हातारी दिसू लागते. आपण त्वचेला कितीही महागडे मेकअप प्रॉडक्ट्स लावले तरी कोरड्या त्वचेवर ते टिकत नाहीत.(Prevent Premature Aging) पण आपलं काम आणि AC दोन्ही सांभाळून त्वचेचा नैसर्गिक ग्लो कसा टिकवायचा, याचे ३ सोपे ब्युटी रूटीन आणि 'मॅजिक सिक्रेट्स' पाहूया. 

पार्लरमध्ये १००० रुपये द्यावे लागतात ते पेडिक्युअर घरी करा, स्वयंपाकघरातील ५ गोष्टी- पाय होतील स्वच्छ-सुंदर

चेहऱ्यावर नुसतं एखादं क्रीम लावणं पुरतं नसतं. त्यासाठी एसीमध्ये जाण्यापूर्वी त्वचेवर ओलाव्याचा थर तयार करणे आवश्यक आहे. यासाठी चेहरा धुतल्यानंतर तो पूर्णपणे कोरडा करण्यापूर्वीच हायलुरोनिक अॅसिड असलेले सीरम किंवा हलके मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेच्या थरांमध्ये पाणी टिकून राहते. हे सीरम हवेतील आर्द्रता शोषून त्वचेला देतात, ज्यामुळे आपली त्वचा दिवसभर मऊ राहते. 

ऑफिसमध्ये कामाच्या गडबडीत आपण त्वचेकडे दुर्लक्ष करतो. आपण डेस्कवर एक फेस मिस्ट किंवा गुलाब पाण्याची स्प्रे बाटली सोबत ठेवा. दर २ ते ३ तासांनी चेहऱ्यावर थोडा स्प्रे करा. हे करताना मेकअर खराब होईल अशी भीती बाळगू नका, कारण फेस मिस्ट त्वचेत लगेच शोषले जाते. यामुळे त्वचेला तात्काळ थंडावा मिळतो. AC मुळे होणारी खाज देखील कमी होते. 

आपल्या चेहऱ्याची डोळ्यांखालची आणि ओठांची त्वचा अधिक पातळ असते. एसीचा सगळ्यात जास्त परिणाम याच भागांवर होतो, ज्यामुळे डोळ्यांखाली फाईन लाईन्स दिसू लागतात. दिवसातून दोनदा लिप बाम आणि अंडर-आय क्रीम वापरा. कामाच्या दरम्यान डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारा. 

एसीमध्ये बसताना त्वचेला मॉइश्चरायझ करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. एसीमध्ये बसल्याने आपल्याला घाम येत नाही. त्यामुळे तहान देखील कमी लागते. शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागल्यास आपली त्वचा अधिक कोरडी पडते. त्यासाठी दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणं देखील महत्त्वाचं आहे. यामध्ये नारळपाणी किंवा ताज्या फळांच्या रसांचा समावेश करा.

English
हिंदी सारांश
Web Title : AC Aging Your Skin? Three Daily Steps for Office Glow.

Web Summary : Office AC dries skin, causing premature aging. Combat this by hydrating with hyaluronic acid serum before AC exposure. Use face mist throughout the day and moisturize lips and under-eyes. Drink plenty of water to maintain skin hydration from within.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी