Join us  

Skin Care Tips : खरंच नारळाचं तेल त्वचेसाठी चांगलं असतं? त्वचारोग तज्ज्ञ तेलाच्या वापराबाबत सांगतात की....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 12:44 PM

Skin Care Tips : नारळाच्या तेलासह कोणताही घटक काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणून जर तुम्ही नारळाच्या तेलात मिसळून कोणताही उपाय त्वचेसाठी करत असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

नारळाचं तेल नैसर्गिक घटकांशी संबंधित असून ते आपल्या स्वयंपाकात किंवा सौंदर्य उत्पादनात रोजच्या वापरात असतंच. नारळाच्या तेलांच्या वापराबाबत अनेक वाद आहेत. ऑईल पुलिंग आणि केसांच्या वाढीसाठी नारळाचे तेल वापरण्याचे फायदे वादात आहेत. परंतु नारळाच्या तेलाचा त्वचेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांमागे विज्ञान आहे.

"नारळाच्या तेलात प्रामुख्याने त्वचेमध्ये एंटी इंफ्लामेटरी आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात,'' असं त्वचारोग तज्ञ आणि येल स्कूल ऑफ मेडिसिनमधील त्वचाविज्ञान सहयोगी क्लिनिकल प्राध्यापक डॉ. मोना गोहारा यांनी इन स्टाईलशी बोलताना सांगितले. या मागे काही वैज्ञानिक कारणंही आहेत. डॉ. गोहारा यांनी एका अभ्यासाकडे लक्ष वेधले ज्यात असे आढळून आले की नारळाचे तेल  एटोपिक डार्माटायटीस (एक्जिमा, त्वचेचा आजार) साठी हायड्रेटिंग ठरते.

हजारो वर्षांपासून, उष्णकटिबंधीय देश नारळाची कापणी करत आहेत आणि या लोकसंख्येचा एक मोठा भाग त्यांच्या उपजीविकेसाठी नारळाच्या पिकावर अवलंबून आहे," स्वच्छ कॉस्मेटिक केमिस्ट आणि केकेटी कन्सल्टंट्सचे संस्थापक कृपा कोएस्टलाइन म्हणतात, ''नारळाच्या अर्काच्या सर्व भागांमध्ये उच्च पोषण आणि आर्थिक मूल्य आहेत."नारळाचे तेल लॉरिक एसिडसाठी ओळखले जाते, जे अँटीमाइक्रोबियल आहे आणि मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाशी लढू शकते.

चेहरा काळपट, थकल्यासारखा झालाय? फेशियल करायला वेळ नाहीये? फ्रेश दिसायचं तर काय कराल?

जरी नारळाचे तेल ब्रेकआउट कमी करण्यास मदत करू शकते, परंतु ते कॉमेडोजेनिक असल्याचे देखील म्हटले जाते, ज्यामुळे छिद्र आणि मुरुमे होतात. डॉ.गोहरा आणि कोएस्टलाइन दोघेही म्हणतात की हे एक मिथक आहे. हार्मोनल बदल, आहार, तणाव, स्वच्छता न ठेवणं यांसह अनेक घटक छिद्र पडण्यास कारणीभूत ठरतात. 

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी नारळाचे तेल सुरक्षित आहे. नारळाच्या तेलासह कोणताही घटक काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणून जर तुम्ही नारळाच्या तेलात मिसळून कोणताही उपाय त्वचेसाठी करत असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

नारळाच्या तेलाचे त्वचेसाठी फायदे

खोबर्‍याच्या तेलाचा उपयोगही सनस्क्रीनसारखा करता येतो. खोबर्‍याच्या तेलामुळे त्वचा सुरक्षित तर राहातेच शिवाय त्वचेचं पोषणही होतं. त्वचेचं मॉश्चरायझिंग या तेलामुळे होतं. खोबर्‍याचं तेल त्वचेस लावल्यास त्वचा मऊ होते. त्वचेचा दाह होत असेल तर ही समस्याही खोबर्‍याच्या तेलानं बरी होते.

 तेलकट पदार्थं खाल्ल्यानं चेहऱ्यावर पिंपल्स येतात? अंगावर खाजही येते? जाणून घ्या खरंच असं होतं का

मेकअप काढण्यासाठी नारळ तेल वापरू शकता. नारळ तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे कार्य करते. आपल्याला त्वचेला मऊ आणि मॉइश्चरायझेशन करायचे असल्यास दररोज मेकअप काढण्यासाठी नारळाचे तेल वापरा.नारळाचं तेल  हे त्वचेतील कोलेजेनचे प्रमाण वाढविण्यात मदत करते.

सुरकुत्या आणि बारीक पुरळ देखील कमी होण्यास मदत होते. नारळाच्या तेलामध्ये एन्टी-ऑक्सिडेंटसह व्हिटॅमिन ई आणि के समृद्ध असते जे त्वचा घट्ट करण्यास मदत करते. जर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर आपण बेसन पीठामध्ये नारळाचे तेल एकत्र करून आपल्या चेहऱ्याला लावले पाहिजे. ज्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स