Lokmat Sakhi >Beauty > 'हा' आहे पुनम ढिल्लोंचा आवडता फेसमास्क! वाढत्या वयातही सौंदर्य कमी होऊ न देण्याचा खास उपाय.. 

'हा' आहे पुनम ढिल्लोंचा आवडता फेसमास्क! वाढत्या वयातही सौंदर्य कमी होऊ न देण्याचा खास उपाय.. 

Skin Care Tips By Actress Poonam Dhillon: वाढत्या वयातही सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(home made face mask by actress Poonam Dhillon)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2025 15:10 IST2025-08-04T15:09:49+5:302025-08-04T15:10:55+5:30

Skin Care Tips By Actress Poonam Dhillon: वाढत्या वयातही सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(home made face mask by actress Poonam Dhillon)

skin care tips by actress poonam dhillon, home made face mask by actress poonam dhillon | 'हा' आहे पुनम ढिल्लोंचा आवडता फेसमास्क! वाढत्या वयातही सौंदर्य कमी होऊ न देण्याचा खास उपाय.. 

'हा' आहे पुनम ढिल्लोंचा आवडता फेसमास्क! वाढत्या वयातही सौंदर्य कमी होऊ न देण्याचा खास उपाय.. 

Highlightsडेडस्किन, टॅनिंग कमी होऊन त्वचेवर खूप छान ग्लो आलेला दिसेल. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पाहा.

काही काही सौंदर्योपचार असे आहेत जे आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. म्हणजेच हरबरा डाळीचं पीठ, मसूर डाळीचं पीठ, कच्चं दूध, बटाट्याचा आणि लिंबाचा रस असे काही पदार्थ आपल्याकडे सौंदर्य खुलविण्यासाठी खूप आधीपासून वापरण्यात येतात. तेच आपल्या आईलाही वापरताना आपण पाहिलेलं आहे आणि आपणही तेच घरगुती उपाय करतो. सर्वसामान्य लोकांप्रमाणेच अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनाही घरगुती सौंदर्योपचार खूप आवडतात आणि त्या नियमितपणे ते उपाय करत असतात. आता अभिनेत्री पुनम ढिल्लो यांनीही त्वचेचं साैंदर्य खुलविण्याचा एक घरगुती नुस्का सोशल मिडियावर शेअर केला असून तो उपाय घरच्याघरी करणं अतिशय सोपं आहे (home made face mask by actress Poonam Dhillon). तो नेमका कसा करायचा ते पाहूया..(skin care tips by actress poonam dhillon)

 

त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी पुनम ढिल्लो करतात 'हा' खास उपाय

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये साधारण २ चमचे बेसन पीठ घ्या. चेहऱ्यावरचं टॅनिंग आणि डेडस्किन काढून टाकण्यासाठी बेसन पीठ अतिशय उपयुक्त ठरतं.

घरातलेच साहित्य वापरून १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट- सगळेच करतील कौतूक

बेसन पिठामध्ये २ टीस्पून ग्लिसरिन घाला. ग्लिसरिनमुळे त्वचा मऊ, कोमल होण्यास मदत होते.

आता त्यामध्ये १ चमचा मध घाला. आपल्या त्वचेमधलं नॅचरल मॉईश्चर टिकवून ठेवून त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी मध खूप उपयुक्त ठरतो. 

 

आता या पिठामध्ये चिमूटभर हळद, दही आणि लिंबाचा साधारण २ चमचे रस घाला. हळदीमुळे त्वचेवर छान ग्लो येतो तर लिंबाच्या रसामुळे त्वचेवरचं टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळण्यास मदत होते.

World Breastfeeding Week 2025: स्तनपान योग्य पद्धतीने होतंय, बाळाचं पोट भरतंय हे ओळखण्यासाठी १० टिप्स

लिंबाच्या रसामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी मुळे त्वचेवर छान चमक येते. 

आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून एकत्र करून घ्या आणि तो लेप चेहऱ्यावर लावा. साधारण १० मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळून लेप काढून टाका. डेडस्किन, टॅनिंग कमी होऊन त्वचेवर खूप छान ग्लो आलेला दिसेल. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पाहा. 


 

Web Title: skin care tips by actress poonam dhillon, home made face mask by actress poonam dhillon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.