लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास प्रसंग असतो. या दिवशी आपण अधिक सुंदर दिसावे असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते.(What not to do before your wedding day) लग्न ठरल्यापासून ते अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत अनेक प्लान ठरतात. (Last-minute bridal skincare fails)
साखरपूडा, हळदी, मेहंदी, प्री-वेडींग आणि लग्न यासाठी लूक कसा असायला हवा याचेही नियोजन केलेले असते.(Bridal skincare tips) आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी आपण मेकअप करण्याचे देखील ठरवतो.(Pre-wedding skincare routine) या खास प्रसंगी आपल्याला अधिक सुंदर कसे दिसता येईल याचा विचार करतो. (Skincare before marriage)
अनेकदा लग्नापूर्वी ब्युटिशियन आपल्या चेहऱ्यासाठी सूट होणाऱ्या मेकअपचा ट्रायल घेतात. फेशियलपासून ते वॅक्सिंग, मेनिक्युअर, पेडिक्युअर यांसारख्या गोष्टी देखील केल्या जातात. परंतु, अनेकदा आपल्या त्वचेला ग्लो येण्याच्या नादात रॅशेस, पुरळ, मुरुमे येतात. त्वचा अधिक संवदेनशील असेल तर ती अधिक खराब होते. अशावेळी लग्नापूर्वीच त्वचा काळी पडणे, स्पॉट आणि पिंपल्स दिसू लागतात. पण लग्नापूर्वी आपण काही चुका केल्या नाही तर त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. लग्न आयुष्यात एकदाच होतं असल्यामुळे अनेकांसाठी हा क्षण खास असतो. या मंगलदिवशी नवरीला सर्वात सुंदर दिसायचे असते. लग्नात सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळलेल्या राहाव्या अशी आशा प्रत्येक नवरीची असते. जर आपलेही लग्न येत्या काही दिवसात असेल तर लग्नापूर्वी चेहऱ्याची काळजी घ्यायला हवी ते पाहूया.
झटपट केस गळती थांबवणारे स्वयंपाकघरातले ५ पदार्थ, केस गळणं थांबेल कसं या प्रश्नाचं उत्तर!
1. उन्हाळा सुरु असल्यामुळे आणि लग्न याच काळात असेल तर आपण दिवसातून २ ते ३ लीटर पाणी प्यायला हवे. त्यापेक्षा जास्त प्यायले तरी चांगले. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होतात.
2. आहारात जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. लिंबू, स्ट्रॉबेरी, संत्री, ब्रोकोली, किवी, पेरू, आंबा या फळांमध्ये जीवनसत्त्व सी अधिक असते.
3. जर आपली त्वचा अधिक तेलकट असेल तर सकाळी आणि रात्री चेहऱ्यावर बर्फाने मसाज करावा. यामुळे मुरुमे, डाग कमी होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर आलेली सूज आणि लालसरपणा कमी होतो. डोळ्यांखाली डार्क सर्कल आले असतील तर बर्फाची मदत होईल.
4. लग्नाच्या २ महिन्या आधी फेशियल करायला हवे. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होतात, रक्त परिसंचरण सुधारते. यामुळे त्वचा चमकदार, मऊ आणि मुलायम होते.
एका बटाट्याच्या रसात मिसळा ‘हा’ पदार्थ, चेहऱ्यावरचे वांग-काळे डाग काही दिवसात होतील गायब
5. आपण जर फेशियल करत असू तर उन्हात जास्त वेळ फिरु नका. घराबाहेर पडताना स्कार्फ किंवा ओढणीने चेहरा झाका. तसेच त्वचेवर सनस्क्रिन, मॉइश्चरायझर वापरण्यापूर्वी ब्युटिशियनचा सल्ला घ्या. अनेकदा यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात, चेहरा लालसर होऊन आग होते. त्यामुळे काहीही करताना सल्ला अवश्य घ्या.
6. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना बॉडीला सनस्क्रिन लावा. यामुळे त्वचा टॅन होणार नाही. अनेकदा आपण या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो परंतु, ऐन लग्नाच्या वेळी हाता पायाची त्वचा काळी दिसू लागली की आपली चिडचिड होते. त्यामुळे आधीच काळजी घ्यायला हवी.
7. ओठांमुळे आपले सौंदर्य वाढते. त्यामुळे लग्नाच्या दिवशी आपले ओठ अधिक सुंदर दिसावे यासाठी त्यांच्यावर लिपबाम लावा. काळे किंवा कोरडे पडलेले ओठ चांगले होतील. तसेच ओठांवरील मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल. अनेकदा ओठांची त्वचा कोरडी झाल्यामुळे आपण ते चावून किंवा हाताने काढतो. यामुळे त्वचेची आग होते. असे करण्याऐवजी ओठांना लिपबाम किंवा दुधाची साय लावा. ज्यामुळे त्यांना नैसर्गिक मॉइश्चरायझर मिळेल.
8. आपल्या स्किन टोननुसार मॉइश्चराझरचा वापर करा. तेलकट त्वचा असेल तर वॉटर बेस मॉइश्चरायझर वापरा. तसेच त्वचेला सिरम देखील लावायला हवे. ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.
9. चेहऱ्यावर ब्लिच किंवा नवीन कोणतीही ट्रिटमेंट करु नका. ब्लिचमुळे चेहऱ्याचे नुकसान होते. त्वचेला लालसरपणा, खाज, जळजळ होते. कोरडेपणा येतो. तसेच त्वचेवर डाग देखील पडतात. यामुळे लग्नाच्या काही दिवसांपूर्वी ब्लिच करु नका. त्वचा दुरुस्त होण्यास वेळ लागू शकतो.