Lokmat Sakhi >Beauty > वयाच्या तिशीत त्वचा सैल झाली? चेहऱ्याला रोज लावा होममेड पॅक, लूज झालेली त्वचा होईल मस्त

वयाच्या तिशीत त्वचा सैल झाली? चेहऱ्याला रोज लावा होममेड पॅक, लूज झालेली त्वचा होईल मस्त

Skincare tips for women in their 30s: Homemade face masks for skin tightening: Best natural masks for tight skin: How to reduce dark circles naturally: Pigmentation treatment at home: Anti-aging skincare tips for 30s: Homemade remedies for dark circles: चेहरा घट्ट करण्यासाठी काही घरगुती फेस मास्कचा वापर करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 13:30 IST2025-03-24T13:30:12+5:302025-03-24T13:30:59+5:30

Skincare tips for women in their 30s: Homemade face masks for skin tightening: Best natural masks for tight skin: How to reduce dark circles naturally: Pigmentation treatment at home: Anti-aging skincare tips for 30s: Homemade remedies for dark circles: चेहरा घट्ट करण्यासाठी काही घरगुती फेस मास्कचा वापर करा.

skin care tips age in 30s homemade skin tightening face masks how to apply dark circle and pigmentation issue | वयाच्या तिशीत त्वचा सैल झाली? चेहऱ्याला रोज लावा होममेड पॅक, लूज झालेली त्वचा होईल मस्त

वयाच्या तिशीत त्वचा सैल झाली? चेहऱ्याला रोज लावा होममेड पॅक, लूज झालेली त्वचा होईल मस्त

वय वाढू लागले की, आपल्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. अशावेळी चेहऱ्यासह कपाळावर देखील रेषा दिसू लागतात. (Skincare tips for women in their 30s)तसेच गालाची त्वचा देखील सैल होते. डोळ्यांभोवती सुरकुत्या दिसू लागतात. अनेकदा हे सर्व योग्य आहार न घेतल्याने आणि अधिक केमिकल असणारे उत्पादने वापरल्याने त्वचा वृद्ध होऊ लागते. (Homemade face masks for skin tightening)


हल्ली वयाची तिशी ओलांडली की, अनेक महिलांमध्ये अकाली वृद्धत्व पाहायला मिळते. (Best natural masks for tight skin)डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे दिसणे. त्वचा निस्तेज होणे किंवा सुरकुत्या पडणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(How to reduce dark circles naturally) आपली त्वचा देखील लूझ दिसू लागली असेल तर आजपासूनच चेहरा घट्ट करण्यासाठी काही घरगुती फेस मास्कचा वापर करा. हे फेस मास्क आठवड्यातून एकदा लावल्याने चेहरा पुन्हा नव्यासारखा होण्यास मदत होईल. कोणता फेस मास्क चेहऱ्यावर लावायला हवा पाहूया. (Homemade remedies for dark circles)

नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पांढरा पदार्थ; रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला करा मालिश, त्वचेचा ग्लो वाढतच जाईल!

1. काकडीचा फेस मास्क 

  • काकडी बारीक करुन त्याची गुळगुळीत पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर लावता येते. 
  • काकडी पेस्टमध्ये दही मिसळून फेस मास्क बनवा. 
  • एक चमचा दह्यात २ चमचे काकडीची पेस्ट मिसळता येते. 
  • काकडीची फेस मास्क १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर ते धुवा. 
  • हा फेस मास्क चेहऱ्याला घट्ट करण्यास मदत करतो. 

 

2. पपईचा फेस मास्क 

  • पपईमध्ये त्वचा घट्ट करण्याचे गुणधर्म भरपूर असतात. ते त्वचेला तरुण बनवण्यास प्रभावी ठरते. 
  • फेस मास्क बनवण्यासाठी पपईचे एक किंवा दोन तुकडे घ्या आणि ते बारीक करा. 
  • त्यात एक चमचा मध घालून पेस्ट तयार करा. 
  • हा फेस मास्क चेहऱ्यावर २० मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा. 

 

3. बेसनाचा फेस मास्क 

  • बेसन त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. 
  • यामुळे त्वचा घट्ट होण्यासह एक्सफोलिएटिंग आणि उजळ करणारे गुणधर्म प्रदान करते. 
  • २ चमचे बेसन दह्यात आणि थोडे गुलाबजल मिसळून फेस पॅक बनवता येते. 
  • हा फेसपॅक अर्धा तास चेहऱ्यावर लावल्यानंतर धुवा, त्वचा उजळण्यासही मदत होईल. 

 

4. केळ्याचा फेस मास्क 

  • केळीचा फेस मास्क त्वचा अधिक घट्ट करण्यास मदत करतो. 
  • या फेस मास्कमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होईल. तसेच त्वचा कोरडी होणार नाही. 
  • फेस मास्क बनवण्यासाठी एक केळी घेऊन ते चांगले मॅश करा. 
  • आता केळीमध्ये मध मिसळवून पेस्ट तयार करा. 
  • हा फेस मास्क १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. 
     

Web Title: skin care tips age in 30s homemade skin tightening face masks how to apply dark circle and pigmentation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.