Join us

Skin Care Tips : त्वचा सैल पडू नये, ओघळू नये म्हणून करा ५ सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 14:45 IST

Skin Care Tips : प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. किरण यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैल त्वचा टाईट करण्यासाठीचे काही उपाय सांगितले आहेत, त्याविषयी...

ठळक मुद्देस्कीन केअर रुटीनमध्ये काही गोष्टी न चुकता केल्या तर त्वचा चांगली राहण्यास मदत होते. कमी वयात वयस्कर दिसायचे नसेल तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी.

आपला त्वचा मुलायम आणि नितळ असावी असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आपण काही ना काही उपाय करत असतो. मात्र तरीही कमी वयात चेहरा सुरकुतणे, चेहऱ्याची त्वचा सैल पडणे, त्वचा रुक्ष होणे अशा समस्या निर्माण होतात. त्वचा कमी वयात सैल पडली तर आपले वय आहे त्यापेक्षा जास्त असल्यासारखे वाटते. यासाठी त्वचा जास्तीत जास्त टाईट राहणे गरजेचे असते. यासाठी पार्लरमध्ये काही ट्रीटमेंटस उपलब्ध असतात. मात्र या ट्रीटमेंटसाठी खूप पैसा खर्च होतो. इतकेच नाही तर यामुळे त्वचेचा पोतही खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी घरच्या घरी काही उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. किरण यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैल त्वचा टाईट करण्यासाठीचे काही उपाय सांगितले आहेत. 

(Image : Google)

१. एक्सफॉलिएशन 

ही एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्यामुळे डेड स्कीन, चेहऱ्यावरची घाण आणि त्वचेतून निर्माण होणारे तेल निघून जाण्यास मदत होते. पण एक्सफॉलिएशन एका मर्यादेपर्यंतच करायला हवे. ही प्रक्रिया जास्त प्रमाणात केल्यास चेहरा खराब होण्याची शक्यता असते. मात्र ठराविक कालावधीने एक्सफॉलिएशन केल्यास चेहऱ्याची त्वचा सैल पडण्यापासून बचाव होऊ शकतो. 

२. फेस मास्क वापरा 

त्वचेला हायड्रेशन मिळण्यासाठी आणि ती चमकदार होण्यासाठी त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक असते. भारतीय त्वचेला सुरुवातीपासूनच डाग, फोड अशा समस्या असतात. या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी आपल्या त्वचेला सूट होईल असे फेस मास्क वापरणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही एखाद्य तज्ज्ञाचीही मदत घेऊ शकता. 

(Image : Google)

३. गरम पाण्याने आंघोळ टाळा

तुमची त्वचा प्रमाणापेक्षा जास्त सैल पडली असेल तर तुम्ही आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करु नका. गरम पाण्यामुळे त्वचेचा ग्लो कमी होतो. फारतत तुम्ही चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करु शकता. पण शक्यतो गार पाणी वापरलेले केव्हाही जास्त चांगले. यामुळे त्वचेचा ताठपणा आहे तसा टिकण्यास मदत होते. 

४. मॉईश्चरायजर लावणे विसरु नका

तुमची त्वचा ऑयली असेल तर वॉटर बेस असलेल्या मॉईश्चरायजरचा वापर करा आणि त्वचा ऑयली असेल तर क्रीम बेस मॉईश्चरायजर लावा. त्वचा टाईट आणि ग्लोईंग ठेवायची असेल तर त्यासाठी मॉईश्चरायजर महत्त्वाचे असते हे लक्षात घ्या. 

५. स्कीन सीरमचा नियमित वापर करा

त्वचेसाठी असे सीरम निवडा जे फार ऑयली नसेल आणि त्वचेमध्ये सहज शोषले जाईल. व्हिटॅमिन सी सीरम तुमच्या त्वचेसाठी उत्तम उपाय ठरु शकतो. आपल्या त्वचेला सूट होणारे आणि जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर केलेल्या सीरमचा वापर करा. यामुळे त्वचेच्या सैलपणाची समस्या उद्भवणार नाही. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी