Lokmat Sakhi >Beauty > जावेद हबीब सांगतात 'हा' पदार्थ मधात मिसळून चेहऱ्याला लावा- ॲक्ने, तेलकट त्वचेसाठी परफेक्ट उपाय

जावेद हबीब सांगतात 'हा' पदार्थ मधात मिसळून चेहऱ्याला लावा- ॲक्ने, तेलकट त्वचेसाठी परफेक्ट उपाय

Best Home Remedies For Reducing Pimples And Acne: तुमचा चेहरा जर तेलकट असेल तर त्यासाठी जावेद हबीब (Javed Habib) यांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2024 06:08 PM2024-06-10T18:08:17+5:302024-06-10T18:09:19+5:30

Best Home Remedies For Reducing Pimples And Acne: तुमचा चेहरा जर तेलकट असेल तर त्यासाठी जावेद हबीब (Javed Habib) यांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय करून पाहा...

skin care solution for oily skin by javed habib, best home remedies for reducing pimples and acne | जावेद हबीब सांगतात 'हा' पदार्थ मधात मिसळून चेहऱ्याला लावा- ॲक्ने, तेलकट त्वचेसाठी परफेक्ट उपाय

जावेद हबीब सांगतात 'हा' पदार्थ मधात मिसळून चेहऱ्याला लावा- ॲक्ने, तेलकट त्वचेसाठी परफेक्ट उपाय

Highlightsपावसाळ्यातही बऱ्याचदा त्वचा तेलकट होण्याचे प्रमाण वाढते. त्वचा खूप ऑईली दिसू लागते. त्यामुळे हा उपाय पावसाळ्यासाठीही चांगला आहे. 

तुमच्या त्वचेचा प्रकार जसा असेल त्यानुसार जर त्वचेला योग्य ट्रिटमेंट मिळाली तर त्वचेच्या जवळपास सगळ्याच तक्रारी कमी होतात. त्वचेवर छान चमक येते आणि मग बाह्य वातावरणाचा त्वचेवर खूपसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आता जावेद हबीब यांनी तेलकट त्वचेसाठी एक उपाय सांगितला आहे. तेलकट त्वचा असेल तर तिच्यावर ॲक्ने, पिंपल्स, पिगमेंटेशन हा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो (best home remedies for reducing pimples and acne). म्हणूनच हा त्रास कमी करण्यासाठी आणि त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी जावेद हबीब यांनी सांगितलेला हा एक सोपा उपाय करून पाहा. (skin care solution for oily skin by Javed Habib)

 

त्वचेवरील ॲक्ने, पिंपल्स कमी करण्यासाठी उपाय

तेलकट त्वचेवर असणारे ॲक्ने, पिंपल्स कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयी जावेद हबीब यांनी jh_hairexpert या इन्स्टाग्राम पेजवर एक उपाय सुचविला आहे.

यामध्ये त्यांनी कॉर्न स्टार्च आणि मध हे दोन पदार्थ वापरण्याचा सल्ला दिला आहे.

चांगली झोप होऊनही सकाळी फ्रेश वाटत नाही- कामाचा आळस येतो? बघा हे मॉर्निंग डिप्रेशन तर नाही ना..

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा कॉर्न स्टार्च घ्या. त्यामध्ये १ चमचा मध घाला आणि ते दोन्ही पदार्थ एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्या. 

आता हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांसाठी तो त्वचेवर तसाच राहू द्या.

 

१० मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि पुसून कोरडा करून घेतल्यानंतर त्यावर मॉईश्चरायझर लावा. 

मांड्यांवरची चरबी दिवसेंदिवस वाढतच चालली? रोज ५ योगासनं करा, मांड्यांची जाडी होईल कमी

हा उपाय केल्याने त्वचा वारंवार तेलकट होण्याचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तसेच त्वचेवरचे पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन कमी होण्यासही मदत होईल.

पावसाळ्यातही बऱ्याचदा त्वचा तेलकट होण्याचे प्रमाण वाढते. त्वचा खूप ऑईली दिसू लागते. त्यामुळे हा उपाय पावसाळ्यासाठीही चांगला आहे. 

 

Web Title: skin care solution for oily skin by javed habib, best home remedies for reducing pimples and acne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.