वय वाढू लागले की, आपल्याला आरोग्याच्या समस्या अधिक सतावू लागतात.(Skin care Tips) वयाची चाळीशी ओलांडली की, त्वचा सैल आणि कोरडी पडू लागते.(pre-bath skincare routine for women) त्वचेवर सुरकुत्या येतात आणि ती निस्तेज दिसू लागते.(what to apply on face before bath for glow) आपले वय लपवण्यासाठी आपण यावेळी अनेक महागड्या स्किनकेअर उत्पादने वापरतो. ज्यामुळे त्वचा आपली तरुण दिसेल असे वाटते. (best face pack before bath)वाढत्या वयात आरोग्यासोबत आपल्याला त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते.(home remedies for skin before 40) डार्क सर्कल, सुरकुत्या दिसू नये म्हणून महागडे उत्पादने लावण्यापेक्षा आपण चेहऱ्यावर काही घरगुती उपाय केले तर फायदा होईल.(anti-aging skincare tips before 40) यासाठी आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर ५ पदार्थांचा वापर करा. ज्यामुळे चेहऱ्याची चमक वाढेल.
कितीही सनस्क्रीन चोपडली तरी चेहरा टॅन दिसतो? ३ चुका चेहरा बिघडवतो, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत
1. हळद आणि दही हळदीत दही कालवून आपल्याला त्वचेच्या अनेक समस्या दूर करता येतात. यासाठी २ चमचे दह्यात चिमूटभर हळदी घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर अर्धा तासाने धुवा. या पेस्टमुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते. त्वचा मऊ आणि चमकदार होतो. त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी ही पेस्ट चांगली आहे.
2. पपईचा फेस पॅक
आपण चेहऱ्यावर पपईचा फेस पॅक लावू शकतो. पपईमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करतात. पपई त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करते. यामुळे त्वचेचा रंग सुधारतो. पपई त्वचेला एक्सफोलिएट करते. यामुळे त्वचेवरील साचलेली सर्व घाण निघून जाते. आठवड्यातून दोन वेळा हा फेस पॅक लावायला हवा.
3. कोरफडीचा गर
कोरफडीचा गर त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. ४० पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला चेहऱ्यावर याचा वापर करु शकतात. यात असणारे गुणधर्म चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग करतात, जे त्वचेला ओलावा देतात. कोरफडीचा गर त्वचेला हायड्रेट करते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म डाग, सुरकुत्या आणि बारीक रेषा काढून टाकण्यास देखील प्रभावी आहेत.
केसगळती थांबेल! मनुक्याचे पाणी केसांसाठी संजीवनी, 'असे' वापरा- केस होतील घनदाट
4. मुलतानी माती आणि गुलाबपाणी
आपण चेहऱ्यावर मुलतानी माती आणि गुलाब पाणी यांचे मिश्रण वापरु शकतो. यासाठी २ चमचे मुलतानी माती घ्या. त्यात गुलाब पाणी मिसळून ते चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे त्वचेची चमक वाढेल. मुलतानी माती त्वचा घट्ट करण्यास मदत करते. तसेच गुलाब पाणी त्वचेला हायड्रेट करते. यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी करता येतात.
5. कॉफी पावडर
त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी एक्सफोलिएशन अधिक महत्त्वाचे आहे. त्वचेला एक्सफोलिएट केल्याने मृत त्वचेच्या पेशी निघून जातात. चेहरा रोज एक्सफोलिएट केला तर त्वचेवर साचलेली सर्व घाण निघून जाईल. त्यासाठी आपण कॉफी पावडर वापरु शकता. कॉफी त्वचेला खोलवर स्वच्च करते. २ चमचे कॉफी पावडरमध्ये साखर आणि पाणी घालून चेहऱ्यावर स्क्रब करा. २ ते ३ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.