Join us  

Skin Care After Using Razor : रेजर रॅश, अनेकींना होतो चुकीचे रेजर वापरल्याने हा नाजूक जागेचा गंभीर आजार; 5 उपाय काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 5:05 PM

Skin Care After Using Razor : आपण जेव्हाही केस काढण्यासाठी चुकीच्या टूल्सचा वापर करतो तेव्हा त्वचेवर पिंपल्स येतात. यामुळे जळजळसुद्धा होते.

अंगावरचे नको असलेले केस काढण्यासाठी रेजरकडे एक सोपा, स्वस्त पर्याय म्हणून पाहिलं जातं. रेजरचा  वापर करण्यासाठी तुम्हाला पार्लर जाण्याचीही गरज नसते. (Skin Care Tips) पण रेजच्या वापरानं अनेकदा त्वचेवर पुळ्या, लालसरपणा उद्भवतो. रेजर बंप्स, बिकिनी बंप्सला रेजर रॅशेज असंही म्हटलं जातं. आपण जेव्हा केस काढण्यासाठी चुकीच्या टूल्सचा वापर करतो तेव्हा त्वचेवर पिंपल्स येतात. यामुळे जळजळसुद्धा होते.  या समस्येकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण संपूर्ण लक्ष तिथे असल्यामुळे आपली सतत चिडचिड होऊ शकते. (how to get rid of razor burn)

१) एकदा रेजर बंप्सची समस्या उद्भवली की, त्यापासून त्वरित आराम मिळवण्याचा पहिला आणि सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्वचेवर गरम कॉम्प्रेस लावणे. तुम्ही सुती कापड गरम करून उगवलेल्या केसांवर लावू शकता.

२) जर त्वचेवर जळण्याची समस्या असेल तर आपण त्यास कोल्ड कॉम्प्रेस द्या. यासाठी एका सुती कपड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि कोल्ड कॉम्प्रेस बनवा. यामुळे जळजळ शांत होईल.

अशी चूक करू नका

एकदा तुम्हाला बंपची समस्या आली की, ही समस्या पूर्णपणे नाहीशी होईपर्यंत पुन्हा रेझर वापरू नका. जर तुम्ही बंप्सवर रेजर चालवलं तर त्वचा सोलली जाते आणि संसर्ग देखील वाढू शकतो. त्वचेवर बंप्स येत असल्यास घट्ट कपडे घालू नका. शक्यतो त्वचेला हवा लागेल असेल लूज कपडे वापरा.

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल सर्वांच्याच घरांमध्ये  असते. जर तुमच्याकडे एलोवेरा जेल नसेल तर तुम्ही कोरफडीचे ताजे पान कापून ते जेल काढू शकता आणि ते तुमच्या त्वचेवर लावू शकता. ते त्वचेला त्वरित थंडपणा देऊन जळजळ देखील शांत करेल आणि बंप्स लवकर अदृश्य होण्यास मदत करेल.

कॅलामाईन लोशन

तुम्ही तुमच्या त्वचेवर कॅलामाइन बॉडी लोशन देखील लावू शकता. रेझरने नको  सलेले केस काढून टाकल्यानंतर लगेच तुमच्या त्वचेवर कॅलामाईन लोशन लावा. हे तुमची त्वचा शांत, चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी काम करेल. तसेच इनग्रोथ हेअर्समुळे येणारे रॅशही कमी होतील. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी