Join us

बीट, बेसन आणि दही, ३ गोष्टी चेहऱ्यावर आणतील गुलाबी ग्लो - खास फेसपॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 19:52 IST

Simple Way To Prepare Beetroot Face Pack At Home चेहऱ्यावर बीटरूटचा करा असा वापर, चेहरा दिसेल फ्रेश करेल ग्लो..

उन्हाळा सुरु झाल्यानंतर त्वचेच्या निगडीत समस्या वाढतात. या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. उन्हात जास्त वेळ राहिल्याने त्वचा निर्जीव व कोरडी दिसू लागते. ज्यामुळे स्किन डल व टॅन होते. आजकाल बाजरात असे अनेक महागडे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत, जे त्वचेची विशेष काळजी घेतात. पण हे प्रॉडक्ट्स त्वचेचे नुकसान देखील करू शकतात.

त्वचा चमकदार व सुंदर करायची असेल तर, बीटरूटचा वापर करून पाहा. बीटरूटमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. यात व्हिटॅमिन बी 6 आणि लोह सारखे घटक असतात. जे त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवतात. बीटरूट फेसमास्कचा वापर केल्याने चेहऱ्यावर गुलाबी ग्लो येतो(Simple Way To Prepare Beetroot Face Pack At Home).

बीटरूटचा फेसमास्क करण्यासाठी लागणारं साहित्य

बीटरूट

बेसन

केसांची वेणी दिसेल जाड, कांद्याचा करा हेअर सीरम, केसांची समस्या होईल छुमंतर

दही

या पद्धतीने करा फेसमास्क

सर्वप्रथम, बीटरूट स्वच्छ धुवून त्याचे २ काप करा. व बीट किसणीने किसून घ्या, किसून झाल्यानंतर बीटरूटचा किस एका प्लेटमध्ये काढून घ्या. एक वाटी घ्या त्यात बीटाचा रस काढून घ्या. रस काढून झाल्यानंतर त्यात एक चमचा बेसन, एक चमचा दही, घालून मिश्रण मिक्स करा.

खूप घाम आल्याने अंगाला खाज सुटते? ३ उपाय- खाज येणं होईल कमी चटकन

तयार मिश्रण चेहऱ्यावर हाताने लावा. १५ मिनिटे झाल्यानंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवा. या फेसमास्कमुळे चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग, व टॅनिंगची समस्या दूर होईल. या फेसमास्कचा वापर आठवड्यातून २ वेळा करा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी