बऱ्याच जणांची केसांची समस्या खूप जास्त वाढलेली आहे. काही जणांचे केस अजिबातच वाढत नाहीत. शिवाय ते खूप जास्त पातळ सुद्धा झालेले असतात. कारण एक तर केसांना वाढ नाही आणि दुसरं म्हणजे केस गळण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे सध्या अनेक जण केसांच्या बाबतीत खूप हैराण आहेत. तुमच्याही केसांना अजिबातच वाढ नसेल किंवा ते खूप जास्त गळत असतील तर हा उपाय लगेचच करायला सुरुवात करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही घरगुती पदार्थच वापरायचे आहेत. शिवाय उपाय खूपच सोपा आहे.
केसांची वाढ चांगली होण्यासाठी काय उपाय करावा?
केसांची वाढ भराभर होण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ seemayadav2278 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
फक्त ५ कामं करा- साध्याच मध्यमवर्गीय घरालाही मिळेल एकदम श्रीमंती लूक... बघा आयडिया
हा उपाय करण्यासाठी एका भांड्यामध्ये २०० मिली पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये २ टेबलस्पून मेथ्या, २ टेबलस्पून जवस आणि २ टेबलस्पून तांदूळ घाला. यानंतर हे पाणी गॅसवर उकळायला ठेवा.
पाणी उकळत असताना ते वारंवार हलवत राहावे. जेव्हा पाणी थोडे घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा. हे पाणी थोडे कोमट होऊ द्या आणि त्यानंतर ते गाळून घ्या.
आता गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये १० मिली साधे पाणी घाला आणि दोन्ही पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
नातीपासून आजीपर्यंत प्रत्येकीने रोज खावा 'हा' पदार्थ - हार्मोन्सचा त्रास कधीच होणार नाही
आठवड्यातून दोन वेळा हे पाणी केसांच्या मुळाशी लावावे. त्यानंतर २ तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास केसांची खूप छान वाढ झालेली दिसेल.