Join us

एक चमचा हळद ‘अशी’ चेहऱ्यावर चोळा-१५ मिनिटांत काळवंडलेला-रापलेला चेहरा दिसेल तेजस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 15:30 IST

Simple Home Hacks To Remove Tanning And Dead Skin: त्वचा खूप काळवंडली असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा..(how to get rid of tanned skin?)

ठळक मुद्देतुम्हाला त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल. महिन्यातून २ ते ३ वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. 

पावसाळा असला तरीही ज्यांना रोजच घराबाहेर जावं लागतं त्यांना हाताला, पायाला, चेहऱ्याला टॅनिंग होतंच.. कारण रोजच ऊन, धूळ, प्रदुषण यांचा मारा त्वचेवर होतो आणि मग त्वचा काळवंडत जाते. डेड स्किनचे प्रमाणही वाढायला लागते. दरवेळी पार्लरमध्ये जाऊन क्लिनअप, फेशियल करणं शक्य नसतं. म्हणूनच अशावेळी हा एक उपाय पाहून घ्या. हा उपाय करून तुम्ही चेहरा, हात, पाय या भागावरचं टॅनिंग तर काढून टाकू शकताच, पण बऱ्याचदा हाताचे कोपरे, पायाचे घोटे, गुडघे, मान, पाठ हे भागही खूप काळवंडून जातात (how to get rid of tanned skin?). त्यांच्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरतो (how to make turmeric mask for removing dead skin?). लहान मुलांचे काळे पडलेले गुडघे, हाताचे कोपरे स्वच्छ करण्यासाठीही हा उपाय चांगला आहे.(simple home hacks to remove tanning and dead skin)

 

टॅनिंग, डेडस्किन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

टॅनिंग, डेडस्किन काढून टाकण्यासाठी हळदीचा नेमका कशा पद्धतीने वापर करता येऊ शकतो, याविषयीची माहिती asha.bajetha या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

श्रावण स्पेशल: मंगळागौर- राखीपौर्णिमेला ठसकेबाज मराठी लूक हवा? मग मोत्यांचे 'हे' दागिने तुमच्याकडे हवेतच..

हा उपाय करण्यासाठी १ चमचा हळद घ्या आणि ती तव्यावर किंवा कढईमध्ये टाकून चॉकलेटी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या.

 

भाजून झालेली हळद थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढा. त्यामध्येच १ चमचा तांदळाचे पीठ आणि १ चमचा दही घाला. आता हा लेप व्यवस्थित कालवून घ्या आणि चेहऱ्याला लावा. 

५ मिनिटांत सोलून होईल किलोभर लसूण! हाताला उग्र वासही येणार नाही, घ्या मस्त देसी जुगाड

चेहऱ्याला लेप लावून झाल्यानंतर सुरुवातीला ५ मिनिटांसाठी हलक्या हाताने चोळून चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर चेहऱ्यावर पुन्हा एकदा त्या लेपचा एक थर द्या आणि त्यानंतर १० मिनिटांनी चोळून लेप काढून टाका. यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल. महिन्यातून २ ते ३ वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी