Lokmat Sakhi >Beauty > पन्नाशीतही श्वेता तिवारी दिसते जशी पंचविशीची! 'या' एका सवयीमुळे त्वचा कायम करते ग्लो, पाहा ब्यूटी मंत्र

पन्नाशीतही श्वेता तिवारी दिसते जशी पंचविशीची! 'या' एका सवयीमुळे त्वचा कायम करते ग्लो, पाहा ब्यूटी मंत्र

Shweta Tiwari beauty secret: Shweta Tiwari glowing skin: Shweta Tiwari skincare routine: श्वेता तिवारीने अनेक मुलाखतींमध्ये सांगते की, सौंदर्य टिकवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पण तिची एक साधीशी सवय तिला आजही इतकी तरुण आणि आकर्षक ठेवते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2025 11:57 IST2025-09-05T11:57:09+5:302025-09-05T11:57:59+5:30

Shweta Tiwari beauty secret: Shweta Tiwari glowing skin: Shweta Tiwari skincare routine: श्वेता तिवारीने अनेक मुलाखतींमध्ये सांगते की, सौंदर्य टिकवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पण तिची एक साधीशी सवय तिला आजही इतकी तरुण आणि आकर्षक ठेवते.

Shweta Tiwari beauty tips for glowing skin at 50 How Shweta Tiwari looks young skincare secret to look younger | पन्नाशीतही श्वेता तिवारी दिसते जशी पंचविशीची! 'या' एका सवयीमुळे त्वचा कायम करते ग्लो, पाहा ब्यूटी मंत्र

पन्नाशीतही श्वेता तिवारी दिसते जशी पंचविशीची! 'या' एका सवयीमुळे त्वचा कायम करते ग्लो, पाहा ब्यूटी मंत्र

त्वचेची काळजी घ्यायची असेल तर आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते महागडी पार्लर ट्रीटमेंट्स, स्किन केअर प्रॉडक्ट्स आणि डेली रुटीन.(Shweta Tiwari beauty secret) पण खऱ्या अर्थाने सौंदर्य टिकवण म्हणजे आपल्याला मनाने आणि शरीराने संतुलित ठेवणं. याच उत्तम उदाहरण म्हणजे हिंदी टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी.(Shweta Tiwari glowing skin) वयाच्या ४२ व्या वर्षी देखील तिचा चेहरा एखाद्या तरुण मुलीसारखा चकाकतो. (Shweta Tiwari skincare routine)
टीव्ही मालिकेत अनेक घराघरांमध्ये पोहचलेली श्वेता तिवारी फक्त अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. वयाची चाळीशी ओलांडली तरी तिचे सौंदर्य आजही अनेकांच्या मनाचे ठाव घेतात. (Shweta Tiwari age and beauty secret) श्वेता तिवारीने अनेक मुलाखतींमध्ये सांगते की, सौंदर्य टिकवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही.(Shweta Tiwari beauty tips) पण तिची एक साधीशी सवय तिला आजही इतकी तरुण आणि आकर्षक ठेवते. ती म्हणजे पाणी पुरेसं पिणं आणि हेल्दी आहार पाळणं. श्वेता तिवारी म्हणते की महागड्या रासायनिक उत्पादनांपेक्षा काही घरगुती उपचार केले तर आपली त्वचा कायम ग्लो करते. (Shweta Tiwari anti-aging secret)

महागड्या पार्लरची ट्रीटमेंट विसरा! २० रुपयांचा 'हा' पांढरा पदार्थ त्वचेला देतो नैसर्गिक ग्लो, डाग-पिंपल्स होतात कमी

तिच्या त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी मुलतानी मातीचा फेस पॅक त्वचेवर लावते. त्यामुळे तिची त्वचा घट्ट राहते. मुलतानी माती त्वचेतील छिद्रांमधून घाण, तेल आणि विषारी पदार्थ प्रभावीपणे काढून टाकते. ज्यामुळे त्वचा कायम तरुण राहते. तसेच त्वचेवरील तेल देखील नियंत्रण करते. त्वचेचा रंग सुधारण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करते. 

हा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे मुलतानी माती, १ चमचा दही किंवा कच्चे दूध, १ चमचा गुलाबजल, २ चमचे हळद आणि १ चमचा चंदन पावडर घेते. सगळ्यात आधी मुलतानी माती पाण्यात १० मिनिटे भिजवा. ती मऊ झाल्यानंतर त्यात दही किंवा दूध घाला, गुलाबजल, हळद आणि चंदन पावडर घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. २० ते २५ मिनिटे सुकू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा आणि मॉइश्चरायझर लावा. तसेच ती दिवसभर स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी ८ ते १० ग्लास पाणी पिते, ज्यामुळे त्वचा आतून हायड्रेट होते आणि नैसर्गिक चमक वाढते. आहारात हंगामी फळे, हिरव्या भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करते. 
 

Web Title: Shweta Tiwari beauty tips for glowing skin at 50 How Shweta Tiwari looks young skincare secret to look younger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.