धूळ- प्रदूषणामुळे आपली त्वचा अधिक खराब होते. चेहऱ्यासाठी नेमकं काय लावावं, चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी आपल्याला समजत नाही.(Shraddha Kapoor beauty secrets) अनेकदा बॉलिवूड कलाकार अनेक त्वचेची काळजी घेण्याविषयी किंवा स्किन प्रोडक्टविषयी विविध जाहिराती करतात.(Shraddha Kapoor skincare routine) आपल्याला असे वाटते की, आपल्या आवडत्या कलाकारने ही क्रीम वापरली म्हणजे ती अधिक सुंदर दिसतेय आणि मग आपणही कसला विचार न करता त्याच आणि तशाच पद्धतीचे महागडे स्किन केअर खरेदी करतो. (Celebrity skincare tips)
श्रद्धा कपूर ही बॉलिवूड जगातील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.(Simple beauty hacks) तिच्या सौंदर्यामुळे तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.(How to reduce pimples naturally) तिच्या चमकदार आणि सुंदर त्वचेचे नेमकं रहस्य काय असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. तिच्या एका मुलाखतीत तिला सौंदर्यामागचे रहस्य काय असं विचारलं होते. त्यावर श्रद्धा म्हणाली की, मी हायड्रा फेशियल करते.(Tips to reduce wrinkles) ज्यामुळे माझी त्वचा कायम क्लिन आणि सुंदर राहते. तसेच त्वचा कायम ग्लो देखील करते. जर आपण देखील हायड्रा फेशियल करण्याचा विचार करत असाल आणि त्याचा खर्च पाहून गोंधाळात सापडले असाल तर घरीच ट्राय करा. घरच्या घरी परवडणाऱ्या किमतीत आपण हायड्रा फेशियल करु शकतो. सोप्या टिप्सच्या मदतीने चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची पाहूया. (Skincare routine for glowing skin)
'या' आजाराने समंथा ग्रस्त, वजनही होतंय भरभर कमी, चाहत्यांना ओळखूही येईना...
1. क्लिंजिंग
चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपण थंड दुधाचा वापर करु शकतो. एक कापसाचा गोळा घेऊन थंड दुधात बुडावा. याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. थंड दुधामुळे चेहरा क्लिंजिंगच्या मदतीने आपली त्वचा स्वच्छ होईल.
2. स्क्रब
आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या स्क्रब करण्यासाठी आपण काही घरगुती पदार्थांचा वापर करु शकतो. एका भांड्यात साखर, कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेतील घाण, ब्लॅकहेड्स आणि मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल.
3. अँटी-एजिंग
वय ओलांडल्यानंतर आपल्या त्वचेवर सुरकुत्या येतात. अशावेळी अँटी एजिंग मसाज हा फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला कोरफडीचा गर आणि त्यात क्रीम मिसळून चेहऱ्यावर लावायला हवे. त्वचेला २ ते ३ मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.
4. फेस पॅक
आपली त्वचा चमकदार करण्यासाठी घरीच फेस पॅक तयार करा. यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये दूध मिसळा आणि मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात चमचाभर मध घाला आणि हाताने चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा चमकण्यास मदत होईल.