झोपतेवेळी केसांची काळजी कशी घ्यावी हा सौंदर्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा विषय आहे. अनेक महिलांना प्रश्न पडतो की रात्री केस बांधून झोपावं की मोकळे सोडून. याचे उत्तम तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी आणि झोपेच्या गुणवत्तेसाठी जाणून घेणं आवश्यक आहे. काहीजणांना केसांची वेणी बांधण्याचा खूपच कंटाळा येतो त्यामुळे ते केस मोकळे सोडून झोपतात तर काहीजण केसांचा आंबाडा बांधतात. (Should You Tie Your Hair Up Leave It Down While Sleeping At Night This One Mistake Could Make You Bald)
केस बांधून का झोपावे?
तज्ज्ञांच्यामते रात्री केस हलके बांधून झोपणं अधिक फायदेशीर ठरतं. केस मोकळे सोडून झोपल्यास झोपेत हालचाल केल्यामुळे ते उशीवर घासले जातात आणि एकमेकांत अडकून गुंता होतो. केस बांधल्यामुळे हे टाळता येते. मोकळ्या केसांचे घर्षण उशीच्या कापडाशी विशेषतः सुती कापडाशी जास्त होते, ज्यामुळे केस कमकुवत होऊन तुटतात. केसांमधील नैसर्गिक तेल किंवा आपण लावलेले हेअर प्रोडक्ट्स झोपेत चेहऱ्याला लागतात. यामुळे मुरुमे (Pimples) येण्याची शक्यता असते. केस बांधलेले असल्यास चेहरा स्वच्छ राहतो.
केस मोकळे सोडून का झोपू नये?
जर तुमचे केस लांब असतील, तर ते मोकळे सोडून झोपल्याने केसांच्या टोकांना फाटे फुटू शकतात. तसेच, सकाळी उठल्यावर केस विंचरताना जास्त वेळ लागतो आणि गुंता काढताना केस उपटले जातात. केस खूप घट्ट बांधून झोपू नका. यामुळे टाळूवर ताण येतो आणि 'ट्रॅक्शन अलोपेसिया' सारख्या समस्या उद्भवून केस गळू शकतात. झोपण्यापूर्वी जाड दातांच्या फणीने केस हलके विंचरून घ्यावेत.
रात्री झोपताना सैल वेणी किंवा डोक्याच्या वरच्या बाजूला सैल अंबाडा घालणे सर्वोत्तम ठरते. शक्य असल्यास सुतीऐवजी सॅटिन किंवा सिल्कच्या उशीचा वापर करा. यामुळे घर्षण कमी होते आणि केस मऊ राहतात.
रात्री केस पूर्णपणे मोकळे न सोडता सैल वेणी घालून किंवा सिल्कच्या स्क्रंचीने बांधून झोपणे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. यामुळे केसांची नैसर्गिक चमक टिकून राहते आणि केस गळती कमी होते. केस तुटणंही कमी होतं तुम्ही हेअरबॅण्डचा वपर करू शकता.
