शिलाजीत (Shilajit) फक्त शरीराची ताकद वाढवण्यासाठीच नाही तर केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक उत्तम उपाय आहे. प्राचीन आयुर्वेदीक टॉनिक मानले जाते. यातील मिनरल्स, फुल्विक एसिड आणि एंटी ऑक्सिडेंट्स केसांना पोषण देतात. ज्यामुळे हेअर फॉल कमी होतो आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. शिलाजीत केसांच्या फॉलिकल्सना मजबूत करते ज्यामुळे हेअर फॉल कमी होतो आणि केस मजबूत राहतात. अर्धा चमचा शुद्ध शिलाजीत पावडर हलक्या कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज सकाळी प्या. (Shilajit For Hair Growth)
शिलाजीतमधील हूमिक एसिड स्काल्पला पोषण देते. या उपायानं केस वेगानं वाढण्यास मदत होते. शिलाजीत स्काल्पवर हलक्या हातानं लावून १० ते १५ मिनिटं लावून ठेवा नंतर माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. शिलाजीत केसांमध्ये मॉईश्चर टिकवून ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे केस सॉफ्ट, शायनी आणि डॅमेज फ्री होतात. आठवड्यातून २ वेळा तुम्ही मास्कप्रमाणे याचा वापर करू शकता. (How To Use Shilajit For Hair Growth)
शिलाजीतमुळे केसांना काय फायदे होतात?
शिलाजीतमध्ये फुल्विक एसिड, व्हिटामी ए, बी, आणि सी असते ज्यामुळे हेअर फॉलिकल्स मजबूत होतात. हे एका नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते. ज्यामुळे केसांना शाईन मिळण्यास मदत होते आणि केस मजबूत-स्ट्राँग दिसतात. याचा फायदा असा की हेअर केअरमध्ये शिलाजीत असल्यास केसांची गुणवत्ता चांगली राहते. (Ref)
एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी बॅक्टेरियल गुण स्काल्पला हेल्दी ठेवते. ज्यामुळे खाज कमी होते. स्काल्प साफ आणि मजबूत राहतो. आणि स्काल्प स्ट्राँग राहण्यासही मदत होते. नियमित याचा वापर केल्यास केस नैसर्गिकरित्या चमकदार आणि सिल्की होतात. पण हेअर सिरम आणि कंडिशनर लावून आठवड्यातून केस एकदा धुवायला हवेत.
केसांसाठी वापरताना अस्सल शिलाजीतचाच वापर करा. वापर करण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका. जास्त वापर केल्यास स्काल्पमध्ये इरिटेशन होऊ शकतं. शिलाजीत आहार आणि स्काल्प केअर यात दोन्हींमध्ये समाविष्ट करा. ज्यामुळे केसांना फायदा होईल आणि केस गळणंही कमी होईल. शिलाजीतमुळे केस हेल्दी, स्टाँग राहतात आणि नैसर्गिक चमक टिकून राहते.