सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केसांच्या अनेक समस्या फार सतावतात. केस गळणे, केस तुटणे, केसांना फाटे फुटणे, अकाली टक्कल पडणे आणि कोंडा यांसारख्या समस्या आता सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत, केसांचे आरोग्य जपण्यासाठी आपण विविध घरगुती उपाय करुन पहातो आणि आहारामध्ये आरोग्यदायी बदल करतात. इतकेच नाही तर काहीजणी, केसांसाठी महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स विकत आणून ते वापरतात परंतु, काहीवेळा अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, अशावेळी नैसर्गिक आणि आहारातून मिळणारे पोषक घटकच अधिक असरदार आणि फायदेशीर ठरतात(shepu benefits for hair health).
आपण केसांवर महागडे शाम्पू आणि सीरम वापरतो, पण खरा उपाय आपल्या स्वयंपाकघरातील एका साध्या पालेभाजीमध्ये दडलेला आहे. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी नुकताच केसांच्या उत्तम वाढीसाठी एका 'सुपरफूड'चा खास उल्लेख केला आहे. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर ऋजुता दिवेकर नेहमीच पारंपरिक भारतीय (shepu for strong and shiny hair) आहारावर भर देताना दिसते. तिच्या मते, केसांची मुळापासून चांगली वाढ होण्यासाठी शेपूची भाजी आहारात नियमितपणे समाविष्ट करणे फार फायदेशीर असते.
आपले आरोग्य आणि सौंदर्याचा विचार करताना आपण अनेकदा महागड्या, आर्टिफिशियल गोष्टींच्या मागे धावतो. मात्र, ऋजुता दिवेकर नेहमीच आपल्या स्थानिक ठिकाणी सहज मिळणाऱ्या भाज्यांचे महत्त्व अधोरेखित करते. तिच्या मते, केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि चमकदार लूकसाठी 'शेपूची भाजी' (Dill Leaves) अत्यंत गुणकारी आहे. हिवाळ्याच्या हंगामात उपलब्ध असलेली ही पालेभाजी लोहाचा उत्तम स्त्रोत असून ती रक्ताभिसरण सुधारते, ज्याचा थेट परिणाम केसांच्या वाढीवर होतो. शेपूमधील आवश्यक पोषक घटक केसांना बळकट करतात, केसांची वाढ सुधारतात आणि स्काल्पच (shepu leaves for hair growth) आरोग्य टिकवून ठेवतात. ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या या सोप्या घरगुती उपायामुळे केसांची नैसर्गिक वाढ कशी होते ते पाहा...
निरोगी केसांसाठी रुजुता दिवेकरने सांगितली 'ही' गुणकारी भाजी...
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली की, "भारतात पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार, बाळंतपणानंतर दिल्या जाणाऱ्या आहारात 'शेपू'चा समावेश आवर्जून केला जातो. ही भाजी झोप सुधारण्यास, मानसिक ताण कमी करण्यास आणि शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत करते. विशेष म्हणजे, केसगळती कमी करण्यासाठी आणि केसांचे नुकसान रोखण्यासाठी शेपू अत्यंत फायदेशीर आहे.
प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं, ९०% लोक करतात एक चूक...
शेपूमध्ये फ्लेव्होनॉइड्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे केवळ केसांचेच नव्हे तर संपूर्ण आरोग्य सुधारतात. तिने पुढे असेही सांगितले की, भारतात शेपूचा वापर विविध प्रकारे केला जातो. थेपला, पराठा, भजी आणि इतकेच नाही तर साधी डाळ किंवा आमटीची चव वाढवण्यासाठीही शेपूचा वापर होतो. तुमच्या केसांना जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी यात व्हिटॅमिन 'सी' आणि बी - १२ मुबलक प्रमाणात असते.
केसांच्या आरोग्यासाठी शेपू कसा आहे फायदेशीर...
१. प्रोटीनचा खजिना :- शेपूमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असते. केसांचे 'फॉलिकल्स' (मुळांची वाढ) होण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी प्रोटीनची अत्यंत गरज असते. शेपू केसांची मुळे आतून घट्ट आणि मजबूत करतात आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
२. व्हिटॅमिन 'ई' आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म :- शेपूमध्ये व्हिटॅमिन 'ई' आणि फायटोकेमिकल्स असतात. हे घटक स्काल्पचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि केसांच्या मुळांना 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस'पासून वाचवतात. यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ वेगाने होते.
३. ओमेगा-३ आणि फॅटी ॲसिड्स :- शेपूमध्ये असणारे ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स स्काल्पला हायड्रेट ठेवण्यास आणि पोषण देण्यास मदत करतात. यामुळे केसांचा कोरडेपणा (Dryness) कमी होतो आणि केसांची लवचिकता वाढते, ज्यामुळे केस लवकर तुटत नाहीत.
४. लेसिथिन :- शेपूमध्ये असलेले 'लेसिथिन' केसांची रचना सुधारण्यास आणि त्यांना मुळांपासून मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय, ते स्कॅल्पला हेल्दी ठेवते, ज्यामुळे केसांची नैसर्गिक चमक, लवचिकता आणि मजबूती वाढते.
