Hair Care: 'फॅब्यूलस लाइव्स वर्सेस बॉलिवूड वाइव्स' शो मध्ये दिसल्यापासून शालिनी पासी सोशल मीडियावर स्टार बनली आहे. लोकांना शालिनी ग्रेसफुल अंदाज तर आवडतच आहे, सोबतच तिचा नम्रपणा आणि हजरजबाबीपणाही लोकांना भावतो आहे. सोबतच तरूणींमध्ये तिच्या सुंदर केसांचं आणि चमकदार त्वचेचं रहस्यही जाणून घ्यायचं आहे. अलिकडेच तिने एका मुलाखतीत तिच्या सौंदर्याचं आणि काळ्याभोर सुंदर मुलायम केसांचं रहस्य सांगितलं. शालिनीचा प्रयत्न हाच असतो की, त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी नॅचरल गोष्टींचा वापर करावा. शालिनीने सांगितलं की, कशाप्रकारे केमिकलचा किंवा कलरचा वापर न करता ती तिचे केस काळे आणि मुलायम ठेवते. जर तुम्हालाही शालिनीसारखे नॅचरल काळे केस हवे असतील तर हा उपाय तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता.
शालिनीच्या काळ्या केसांचं रहस्य
शालिनी पासीने सांगितलं की, ती तिच्या केसांवर कलरचा वापर कधीच करत नाही. तिचे केस नॅचरल पद्धतीने काळे आहेत. ती सांगते की, तिचे केवळ दोनच केस पांढरे आहेत. एक कोरोना महामारीदरम्यान पांढरा झाला होता आणि दुसरा केस मुलाच्या अॅडमिशनच्या टेंशनमध्ये पांढरा झाला होता.
आपल्या केसांवर शालिनी रीठा आणि आवळ्याचा वापर करते. आवळा आणि रीठा २४ तासांसाठी भिवजून ठेवा. नंतर ते बारीक करून केसांवर लावलं जातं. रीठा आणि आवळे नॅचरल शाम्पूसारखे काम करतात. यांच्या वापराने केसांना नॅचरल पोषण मिळतं आणि केस काळे राहतात.
त्याशिवाय केसांवर चमक कायम ठेवण्यासाठी शालिनी पासी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करते. ती केसांवर कधीच जेल लावत नाही. त्याऐवजी तेल लावते.
शालिनी सांगते की, केसांची काळजी घेण्यासाटी ती सिलीकॉन असलेल्या उत्पादनांपासून दूर राहते. शालिनी केसांवर केमिकल असलेल्या शाम्पूचा वापर करत नाही आणि हीटिंग टूल्सचा देखील वापर करत नाही.
रीठा-आवळा-शिकेकाईचे फायदे
रीठा
केस मुळापासून मजबूत आणि काळे ठेवण्यासाठी रीठ्याचा वापर फायदेशीर मानला जातो. रीठा नॅचरल क्लींजरच्या रूपात काम करतं. यात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गुण असतात. जे इन्फेक्श आणि ड्रॅंड्रफसारख्या समस्या दूर करतात.
आवळा
व्हिटॅमिन, मिनरल्स, अमीनो अॅसिड आणि फायटोन्यूट्रिएंट्स असलेल्या आवळ्याने केसगळतीची समस्या दूर होते. तसेच केसांची वाढ होण्यासाठीही आवळा खूप फायदेशीर ठरतो.
शिकेकाई
शिकेकाईमध्ये केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्याचे गुण असतात. शिकेकाईचं तेल, पावडर किंवा शाम्पूने केसांच्या समस्या दूर होतात.