त्वचेच्या अनेक समस्यांपैकी पिगमेंटेशनची समस्या ही अनेकजणींना सतावते. त्वचेवरील पिगमेंटेशन म्हणजेच चेहऱ्यावर येणारे काळे डाग किंवा चट्टे, यामुळे आपले सौंदर्य (These natural home remedies for pigmentation will make your skin clean and clear) बिघडू शकते. आपल्यापैकी अनेकजणींना कपाळ, डोळ्यांकडील भाग, गाल, हनुवटी अशा वेगवेगळ्या भागांवर पिगमेंटेशन येते. आपल्या त्वचेवरील पिगमेंटेशनचे काळे डाग आणि चट्टे घालवण्यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. पिगमेंटेशनची समस्या फारशी गंभीर नसली तरी वेळीच लक्ष न दिल्यास ही समस्या वाढू शकते(Shahnaz Hussain Home Remedies For Pigmentation).
कधीकधी हे डाग लहान असतात तर कधीकधी ते संपूर्ण चेहऱ्यावर पसरतात. जर आपल्या चेहऱ्यावरील पिगमेंटेशन दिवसेंदिवस वाढत गेले तर चेहरा अधिकच खराब दिसू लागतो. पिगमेंटेशन घालवण्यासाठी अनेकजणी महागड्या स्किनकेअर प्रॉडक्ट्सपासून ते अनेक घरगुती उपायांपर्यंत सगळेच उपाय करुन पाहतात. परंतु या पिगमेंटेशनच्या समस्येवर अनेक घरगुती उपाय करताना आपल्या स्वयंपाकघरातील नेमके कोणते पदार्थ, असरदार ठरु शकतात याबद्दल ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसैन यांनी अधिक माहिती सांगितली आहे. शहनाज हुसैन यांच्या मते, आपल्या स्वयंपाकघरातील नेमके कोणते पदार्थ पिगमेंटेशन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात ते पाहा(Shahnaz Husain’s Effective Home Remedies to Prevent And Treat Hyperpigmentation).
पिगमेंटेशनची समस्या होईल दूर....
१. बटाटा :- बटाट्यामध्ये एक विशेष एंझाइम असते जे त्वचेला नैसर्गिकरित्या उजळवण्यास आणि पिगमेंटेशनची समस्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एक कच्चा बटाटा घ्या, त्याच्या पातळ चकत्या करा आणि त्वचेवरील पिगमेंटेशन असलेल्या भागावर हलक्या हाताने चोळून लावा. बटाट्याचा रस त्या भागावर ५ मिनिटे तसाच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. दररोज हा उपाय केल्यास त्वचा उजळते आणि पिगमेंटेशनची समस्या कमी होण्यास मदत होते.
त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...
२. मसूर डाळ :- मसूर डाळ फक्त खाण्यासाठीच नाही तर त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील अतिशय फायदेशीर ठरते. मसूर डाळ त्वचेचा रंग सुधारण्यास, डेड स्किन काढून टाकण्यास आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. यासाठी एक कप मसूर डाळ रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ही डाळ बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर मास्कसारखी लावा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या उपायामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार होते. आठवड्यातून १ ते २ वेळा हे मिश्रण लावल्यास त्वचेवर चांगले परिणाम दिसून येतील.
चेहऱ्याला कोण चपाती लावतं? पाहा नवीन व्हायरल ब्यूटी ट्रेंड-गव्हाच्या चपातीचा शीटमास्क...
३. टोमॅटो :- टोमॅटो हा त्वचेचा रंग उजळवण्याचा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. टोमॅटोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि अॅसिडिक घटक त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतात. यासाठी टोमॅटोचा गर काढा आणि तो चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे तसेच राहू द्या, नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या उपायाने त्वचा ताजी, स्वच्छ व उजळ होते. नियमित वापरल्यास पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेला नैसर्गिक चमक येते.
४. तांदुळाचे पीठ :- पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तांदुळाचे पीठ आणि मध देखील उपयुक्त ठरु शकते. हा उपाय करण्यासाठी सगळ्यातआधी एका मिक्सरच्या भांड्यात २ ते ३ चमचे तांदळाचं पीठ घ्या. नंतर यात १ ते २ चमचे मध मिसळा. २ ते ३ चमचे दळलेले ओट्स घाला. हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून वाटून घ्यावे. हे मिश्रण साधारण २० ते ३० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरू शकता. या फेसपॅकच्या वापराने, पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागेल.