lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > Selfie Day 2021 : एकदम सुंदर, अट्रॅक्टीव्ह सेल्फी कसा काढायचा? मग त्यासाठी या घ्या टिप्स 

Selfie Day 2021 : एकदम सुंदर, अट्रॅक्टीव्ह सेल्फी कसा काढायचा? मग त्यासाठी या घ्या टिप्स 

Selfie Day 2021: अनेकजण सेल्फी काढतात पण ते सुंदर दिसण्याऐवजी भयंकर दिसतात, त्यावर हा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:21 AM2021-06-21T11:21:14+5:302021-06-21T11:42:37+5:30

Selfie Day 2021: अनेकजण सेल्फी काढतात पण ते सुंदर दिसण्याऐवजी भयंकर दिसतात, त्यावर हा उपाय

Selfie Day 2021: How to click attractive, beautiful selfie, use this tips for click selfie | Selfie Day 2021 : एकदम सुंदर, अट्रॅक्टीव्ह सेल्फी कसा काढायचा? मग त्यासाठी या घ्या टिप्स 

Selfie Day 2021 : एकदम सुंदर, अट्रॅक्टीव्ह सेल्फी कसा काढायचा? मग त्यासाठी या घ्या टिप्स 

Highlightsआपला फोटो कोणत्या अँगलने जास्त चांगले येतात ते प्रत्येकाला माहित असतं. सेल्फी क्लिक करताना ते लक्षात ठेवा.तुमच्या फोटोला एकाद्या फोटो अॅप मध्ये एडिट करा. इन्स्टाग्राम, पिक्सलरओमॅटिक, स्नॅपसीडसारख्मा अॅप्समध्ये तुम्हाला छान इफेक्टस मिलतील.

(Image Credit : Live Science)

सेल्फी

ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये नव्याने ऍड झालेला हा शब्द....शब्दाचा अर्थ अगदी सोपा....स्वतःच स्वतःचा काढलेला फोटो...सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सवर अशा फोटोजना देण्यात आलेलं हे नाव...2013 मध्ये हा शब्द इतका वापरला गेला की ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या यादीत तो दाखल झाला...शिवाय 2013च्या सगळ्यात जास्त 'अनॉयिंग' शब्दांच्या यादीतही हा शब्द आहे.

वेबकॅम, कॅमेरा किंवा मोबाईल काहीही वापरून तुम्ही सेल्फी क्लिक करू शकता...पण त्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील. कारण सुरुवातीला फोटो वाकडेतिकडे येतात, क्लिक करताना हात हलतो आणि फोटो ब्लर होतो, असे अनेक प्रकार घडतात. पण तुम्हाला जर छान सेल्फीज क्लिक करायच्या असतील तर या काही टिप्स
 
बॅकग्राउंड

छान फोटोजसाठी छान बॅकग्राउंड असायलाच हवी. म्हणूनच मग फोटो काढताना छान रंगाच्या भिंतीच्या पुढ्यात किंवा चांगल्या जागी उभे रहा.

लाईट

प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईट. सेल्फी क्लिक करताना उजेड तुमच्या चेहऱ्यावर आणि कॅमेऱ्याच्या मागून यायला हवा. अगदी भगभगीत उजेड असलेल्या ठिकाणी किंवा मग अगदीच कमी उजेड असलेल्या ठिकाणी उभं राहू नका.

स्वतःचा फोटो काढताना स्थिर उभं राहणं जरा कठीण जातं. क्लिक करताना बहुतेकदा हात हलतो. दोन्ही हातांनी फोन धरून फोटो काढणं शक्य नसतं. अशावेळी फोनमधलं टायमर फंक्शन वापरू शकता. किंवा मग तुम्ही कोणाच्या सोबत फोटो क्लिक करत असाल तर त्या व्यक्तीलाही एका हाताने फोनला आधार द्यायला सांगा.

तुमच्या फोनला क्लिक करण्यासाठी डेडिकेटेड की नसेल तर मग हे काम आणखीन कठीण होतं, कारण फोनची स्क्रीन दिसत नसताना बरोबर की दाबणं कठीण होतं. अशावेळी फोनमधलं सेटिंग बदलून स्क्रीन टच क्लिकचा आॅप्शन वापरा. बहुतेक फोन्सचा फ्रंट फेसिंग कॅमेरा फारसा ग्रेट नसतो. त्यामुले बॅक कॅमेऱ्यानेच फोटो क्लिक करा. फोटोची क्वालिटी चांगली मिळेल. एकच क्लिक करण्यापेक्षा जास्त फोटोज क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आॅप्शन्स मिळतील. तुमच्या फोनला बर्स्ट मोड असेल तर तो वापरा. म्हणजे एकाच क्लिकमध्ये काही सेकंदांत खूप फ्रेम्स क्लिक होतील.

अँगल

आपला फोटो कोणत्या अँगलने जास्त चांगले येतात ते प्रत्येकाला माहित असतं. सेल्फी क्लिक करताना ते लक्षात ठेवा.

एडिट

तुमच्या फोटोला एकाद्या फोटो अॅप मध्ये एडिट करा. इन्स्टाग्राम, पिक्सलरओमॅटिक, स्नॅपसीडसारख्मा अॅप्समध्ये तुम्हाला छान इफेक्टस मिळतील.
 

Web Title: Selfie Day 2021: How to click attractive, beautiful selfie, use this tips for click selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.