हिवाळा जेवढा छान वाटतो, तेवढाच त्रासदायक असतो. छान गुलाबी थंडी अनुभवायची म्हटली की सर्दी होते. खोकला होतो. ( See the causes and simple solutions for dry lips)अंग थंडीमुळे आखडून जातं. एवढंच नाही तर त्वचेच्या बऱ्याच समस्या उद्भवायला लागतात. त्वचा अगदी सुरकतून जाते. त्यावर मग आपण वेगवेगळ्या क्रिम लावतो. विविध उपाय करून बघतो. त्वचेप्रमाणे ओठांचीही वाट लागून जाते. ( See the causes and simple solutions for dry lips)ओठ अगदी फुटून जातात. त्यातून रक्त येते. ओठांची त्वचा पांढरी होते. साधी जीभ लागली तरी झोंबायला लागते. तुम्हालाही असं होतं का? जाणून घ्या असं का होतं? नक्की काय करायला हवं?
ओठ फुटण्याची कारणे१. ओठाला कोरड पडते त्यामुळे ओठ फुटतात.( See the causes and simple solutions for dry lips) त्याला पाणी लावले तरी फायदा होत नाही कारण कोरड बाहेरून नाही तर आतून पडलेली असते.
२. तुमचे ओठ जर कायम फुटत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला कसली तरी अँलर्जी आहे.
३. सतत ओठ चावण्याची काहींना सवय असते. ओठ चावल्यामुळेही ते कोरडे पडतात आणि फुटतात.
घरगुती उपाय
१ ओठ फुटल्यावर सगळ्यात मस्त उपाय म्हणजे खोबरेल तेल लावणे. खोबरेल तेल भेगाही भरते आणि ओलावा देते.
२. भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ओठ कोरडे पडतात. शरीर हायड्रेटेड ठेवल्यावर ओठही फुटत नाहीत.
३. ओठांना तूप लावा. तुपामध्ये लिप बामपेक्षा जास्त सत्व असतात. त्यामुळे तूप लावल्यावर ओठ अगदी छान गुलाबी राहतात.
४. सतत ओठ चाटणे टाळा. ओठ चावणे टाळा. म्हणजे ओठांची त्वचा निघून जाणार नाही.
५. जीवनसत्त्व 'बी' व 'सी' असलेले पदार्थ खा. त्यांच्या कमतरतेमुळे देखील ओठ फुटतात.
६. रसायनयुक्त लिपस्टिक, लिप बाम, तसेच इतर सौंदर्य प्रसादने वापरू नका. त्यांच्यामुळे ओठांना अँलर्जी होते.
७. बाकी या उपायांनी फरक पडत नसेल तर डॉक्टरांकडे जा. त्यांचा सल्ला घ्या.