Lokmat Sakhi >Beauty > अभिनेत्री रोशनी चोप्रा करते हा खास उपाय, डोळ्यांचा थकवा-डल स्किन होईल मिनिटांत गायब-दिसाल सुंदर...

अभिनेत्री रोशनी चोप्रा करते हा खास उपाय, डोळ्यांचा थकवा-डल स्किन होईल मिनिटांत गायब-दिसाल सुंदर...

Roshni Chopra Use Homemade Face Mask For Dull Skin & Under Eye Dark Circles : Roshni Chopra Reveals Her Skin Care Secrete : डोळ्यांचा थकवा व काळवंडलेली त्वचा पुन्हा ताजीतवानी करण्यासाठी रोशनी चोप्रा कोणता घरगुती उपाय करते ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 14:40 IST2025-05-30T14:25:23+5:302025-05-30T14:40:11+5:30

Roshni Chopra Use Homemade Face Mask For Dull Skin & Under Eye Dark Circles : Roshni Chopra Reveals Her Skin Care Secrete : डोळ्यांचा थकवा व काळवंडलेली त्वचा पुन्हा ताजीतवानी करण्यासाठी रोशनी चोप्रा कोणता घरगुती उपाय करते ते पाहा...

Roshni Chopra Use Homemade Face Mask For Dull Skin & Under Eye Dark Circles Roshni Chopra Reveals Her Skin Care Secrete | अभिनेत्री रोशनी चोप्रा करते हा खास उपाय, डोळ्यांचा थकवा-डल स्किन होईल मिनिटांत गायब-दिसाल सुंदर...

अभिनेत्री रोशनी चोप्रा करते हा खास उपाय, डोळ्यांचा थकवा-डल स्किन होईल मिनिटांत गायब-दिसाल सुंदर...

सध्याच्या बदलत्या लाईफस्टाईलचा परिणाम आपली त्वचा, डोळे आणि संपूर्ण शरीरावर होतोच. त्वचा कोमेजलेली, निस्तेज दिसू लागते आणि डोळ्यांखाली काळे वर्तुळे किंवा सूज येऊ लागते. बिझी डेली रुटीन, झोपेची कमतरता आणि प्रदूषण यामुळे चेहऱ्यावरील फ्रेशनेस हरवतो आणि त्वचा काळवंडलेली दिसू लागते इतकेच (Roshni Chopra Use Homemade Face Mask For Dull Skin & Under Eye Dark Circles) नव्हे तर डोळ्यांखाली थकवा स्पष्ट दिसतो. थकलेले डोळे, काळवंडलेली त्वचा यांसारख्या समस्यांसाठी आपण अनेक आर्टिफिशियल उपाय करतो, परंतु याचा परिणाम काही दिवसांपुरताच मर्यादित असतो. अशा परिस्थितीत, आर्टिफिशियल उपाय करण्यापेक्षा आपण काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकतो(Roshni Chopra Reveals Her Skin Care Secrete). 

बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस व ब्यूटी इन्फ्लुएंसर रोशनी चोप्रा हिने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक सोपा, नैसर्गिक आणि घरगुती उपाय सांगितला आहे. अभिनेत्री रोशनी चोप्रा डोळ्यांचा थकवा आणि काळवंडलेली त्वचा यांसारख्या समस्यांवर कोणतेही महागडे किंवा आर्टिफिशियल उपाय न करता, घरगुती उपाय करणे अधिक पसंत करते. डोळ्यांचा थकवा आणि काळवंडलेली त्वचा पुन्हा ताजीतवानी आणि फ्रेश  करण्यासाठी अभिनेत्री रोशनी चोप्रा (Roshni Chopra) नेमका कोणता घरगुती उपाय करते ते पाहूयात. 

 डोळ्यांचा थकवा आणि काळवंडलेल्या त्वचेची समस्या राहील दूर... 

डोळ्यांचा थकवा आणि काळवंडलेल्या त्वचेची समस्या दूर ठेवण्यासाठी, अभिनेत्री रोशनी चोप्रा दही आणि काकडीचा रस या दोन पदार्थांचा फेस व अंडर  आय मास्क तयार करते. हा फेस व अंडर आय मास्क तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून दही आणि काकडीचा रस एकत्रित मिसळून फेसमास्क तयार करावा. 

पपईची पानं म्हणजे त्वचेसाठी वरदान, पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क चेहऱ्यावर आणतो नवी चमक...

लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...

याचा वापर कसा करावा ? 

तयार फेस व अंडर आय मास्क डोळ्यांखाली लावताना कॉटन पॅड्स या फेसमास्कमध्ये भिजवून डोळ्यांखाली ठेवून द्यावे. त्यानंतर काकडीचा एक छोटा तुकडा कापून त्यावर तयार फेसमास्क लावून तो त्या तुकड्याने संपूर्ण चेहऱ्यावर मास्क लावून १५ ते २० मिनिटे तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर, पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा उपाय आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा केल्यास थकलेले डोळे, काळवंडलेली त्वचा यांसारख्या समस्यां दूर राहण्यास मदत होईल.     

अजूनही त्वचेसाठी केमिकल्सयुक्त ब्लिच वापरताय?घरच्याघरी करा नॅचरल ब्लिच-त्वचा दिसेल तजेलदार!

हा फेस व अंडर आय मास्क लावण्याचे फायदे... 

१. काकडीचा रस :- काकडीचा रस त्वचेला नैसर्गिक थंडावा देतो. डोळ्यांखालील सूज आणि काळसरपणा कमी करुन त्वचेतील अतिरिक्त तेल शोषते. यासोबतच हायड्रेशन वाढवते, ज्यामुळे त्वचा मऊ व ताजीतवानी दिसते.

२. दही :- त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते. त्वचेला पोषण देऊन ती उजळवते. यासोबतच, त्वचा मऊ, मुलायम आणि ग्लोइंग बनवते.


Web Title: Roshni Chopra Use Homemade Face Mask For Dull Skin & Under Eye Dark Circles Roshni Chopra Reveals Her Skin Care Secrete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.