Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त सुगंधीच नाही तर औषधीही असते गुलाब पाणी, त्वचेला - पोटाला थंडावा .. फक्त ‘असा’ करा उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 16:39 IST

Rose water is not only fragrant but also medicinal, it is cooling to the skin and stomach.. just use it 'like this' : गुलाब पाणी त्वचेसाठी उत्तम. कसे वापरावे जाणून घ्या.

गुलाबपाणी हे आपल्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी अतिशय सौम्य, नैसर्गिक आणि प्रभावी घटक मानले जाते. विशेषतः उन्हाळ्यात वाढणारी उष्णता,सतत येणारा घाम, त्वचेवरील वाढणारे पुरळ त्यामुळे होणारी चिडचिड आणि वाढणारा निस्तेजपणा यावर गुलाबपाणी एक सोपा आणि घरगुती उपाय ठरतो. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि थंडावा देणारे गुणधर्म त्वचेला ताजेतवाने ठेवतात.

त्वचेसाठी गुलाबपाणी कसे वापरावे हे समजून घेतले तर त्याचा फायदा अधिक चांगल्या प्रकारे मिळवता येतो. सर्वात सोपा उपाय म्हणजे गुलाबपाणी टोनर म्हणून वापरणे. (Rose water is not only fragrant but also medicinal, it is cooling to the skin and stomach.. just use it 'like this')चेहरा धुतल्यानंतर कापसाच्या बोळ्यावर थोडे गुलाबपाणी घेऊन चेहऱ्यावर लावल्यास त्वचेतील धूळ, तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा फ्रेश वाटते. दररोज असे केल्याने त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागते.

याशिवाय फेसपॅकमध्येही गुलाबपाणी वापरता येते. बेसन, चंदन किंवा मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांच्यासाठी गुलाबपाणी एक सुरक्षित पर्याय आहे, कारण ते त्वचेवर सौम्यपणे काम करते. त्वचेला त्रास होत नाही. शिवाय सुगंधही मस्त असतो.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा घामोळ्या होतात. अशावेळी गुलाबपाणी थेट त्वचेवर स्प्रे केल्यास लगेच थंडावा मिळतो. कुठून बाहेरुन आल्यावर चेहऱ्यावर गुलाबपाणी शिंपडल्यास त्वचा ताजीतवानी होते. डोळ्यांवर कापसाचे बोळे गुलाबपाण्यात भिजवून ठेवले तर डोळ्यांचा थकवा आणि सूज कमी होते.

गुलाबपाणी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठीही उपयोगी आहे. थंड पाण्यात थोडे गुलाबपाणी मिसळून चेहरा किंवा हात-पाय धुतल्यास शरीराला लगेच आराम मिळतो. काहीजण ते पाण्यात थोड्या प्रमाणात घालून पिण्यासाठीही वापरतात, पण ते शुद्ध आणि खाण्यायोग्य (food grade) असावे याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.एकंदरीत, गुलाबपाणी हे केवळ सौंदर्यवर्धक नसून शरीराला थंडावा देणारे आणि त्वचेची काळजी घेणारे एक बहुपयोगी नैसर्गिक साधन आहे. रोजच्या दिनचर्येत याचा योग्य वापर केल्यास त्वचा निरोगी, तजेलदार आणि फ्रेश राहू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Rose water: Not just fragrant, medicinal too; cools skin, stomach.

Web Summary : Rose water cools and refreshes skin, reducing irritation and tanning. It's a versatile remedy for summer heat, suitable for sensitive skin, and can be added to water for internal cooling.
टॅग्स :होम रेमेडीत्वचेची काळजीब्यूटी टिप्ससोशल व्हायरल