Hair Care Tips : हिवाळ्यात तशा तर केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या अनेकांना होतात. पण यातील दोन मुख्य समस्यांचा जास्तीत जास्त लोकांना सामना करावा लागतो. त्या समस्या म्हणजे केसगळती आणि केसात कोंडा होणे. अशात केसगळती रोखण्यासाठी आणि कोंडा घालवण्यासाठी वेगवेगळे शाम्पू, केमिकल्स आणि तेलांचा वापर केला जातो. पण यांचा वापर न करताही या समस्या दूर करता येतात.
स्कीन एक्सपर्ट रोहित सचदेवा यांनी एका व्हिडिओद्वारे काही या समस्या दूर करण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. एका नॅचरल उपाय केसगळती आणि केसातील कोंडा दूर केला जातो जाऊ शकतो.
रोहित सचदेवाने सांगितलं की, हा एक नॅचरल उपाय असून एक हर्बल टॉनिक आहे. याने केसांमधील कोंडा लगेच दूर होईल आणि केसगळतीही थांबेल. तसेच केस आणखी मजबूत आणि मुलायम होतील.
हेअर टॉनिक बनवण्यासाठी साहित्य
- एलोवेरा - 1 पान
- खोबऱ्याचं तेल - 3-4 चम्मचे
- आले - 1 तुकडा
- कडूलिंबाची पाने - 10-15
कसं बनवाल हेअर टॉनिक?
- सगळ्यात आधी एलोवेराचं एक पान घ्या आणि एका चमच्याच्या मदतीने त्याचं जेल काढा.
- एक कढई घ्या आणि त्यात एलोवेरा जेल टाकून उकडून घ्या.
- त्यानंतर कढईमध्ये 3 ते 4 चमचे खोबऱ्याचं तेल आणि 1 आल्याचा तुकटा किसून टाका.
- नंतर शेवटी कडूलिंबाची पाने कढईत टाका आणि सगळ्या गोष्टी 10 ते 15 मिनिटे चांगल्या होऊ द्या.
- नंतर हे मिश्रण गाळून एका भांड्यात काढा. हे टॉनिक तुम्ही बॉटलमध्ये भरून ठेवा.
हे टॉनिक केस धुण्याच्या 30 मिनिटांआधी केसांवर लावावं. काही दिवसात फरक दिसेल.
कोंडा होण्याची कारणे
तशी तर उन्हाळ्यातही कोंड्याची समस्या होते. पण हिवाळ्यात ही समस्या जास्त बघायला मिळते. डोक्याच्या त्वचेची योग्यपणे स्वच्छता न करणे, वेगवेगळे तेल, गरम पाण्याचा वापर आणि डेड स्कीन जमा होणे यामुळे केसात कोंडा होतो.
केसगळती होण्याचं कारण
कोंड्यासोबतच केसांची एक कॉमन समस्या म्हणजे केसगळती. कोरड्या हवेच्या संपर्कात आल्याने केस कमजोर होतात. जेव्हा हेअर फॉलिकल कमजोर होतात, तेव्हा केसगळतीची समस्या अधिक वाढते.