Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > थंडीने चेहऱ्याची त्वचा फुटली, सुरकुत्या पडल्या? चमचाभर बदाम तेल 'असं' लावा - त्वचा दिसेल मऊमुलायम कापसासारखी...

थंडीने चेहऱ्याची त्वचा फुटली, सुरकुत्या पडल्या? चमचाभर बदाम तेल 'असं' लावा - त्वचा दिसेल मऊमुलायम कापसासारखी...

Right Way to Use Almond Oil on Face to Reduce Dryness During Winters : almond oil for dry skin in winter : how to use almond oil on face : almond oil for face dryness : बदाम तेल त्वचेला खोलवर पोषण देते, कोरडेपणा दूर करते आणि त्वचा मऊ, चमकदार व हेल्दी ठेवण्यास मदत करते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2025 11:40 IST2025-12-11T11:38:00+5:302025-12-11T11:40:02+5:30

Right Way to Use Almond Oil on Face to Reduce Dryness During Winters : almond oil for dry skin in winter : how to use almond oil on face : almond oil for face dryness : बदाम तेल त्वचेला खोलवर पोषण देते, कोरडेपणा दूर करते आणि त्वचा मऊ, चमकदार व हेल्दी ठेवण्यास मदत करते...

Right Way to Use Almond Oil on Face to Reduce Dryness During Winters how to use almond oil on face almond oil for face dryness | थंडीने चेहऱ्याची त्वचा फुटली, सुरकुत्या पडल्या? चमचाभर बदाम तेल 'असं' लावा - त्वचा दिसेल मऊमुलायम कापसासारखी...

थंडीने चेहऱ्याची त्वचा फुटली, सुरकुत्या पडल्या? चमचाभर बदाम तेल 'असं' लावा - त्वचा दिसेल मऊमुलायम कापसासारखी...

हिवाळा ऋतू जरी आरामदायक आणि सुखकारक वाटत असला, तरी या ऋतूत अनेक समस्या सतावतात. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठा हळूहळू वाढू लागला की, त्वचेच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. हिवाळ्यातील या थंड वातावरणाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. वातावरणातील गारठ्याने  त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता कमी होते. परिणामी, त्वचा कोरडी पडते, निस्तेज दिसते आणि अनेकदा ती फुटू लागते. या समस्येमुळे त्वचेवर खाज येणे, भेगा पडणे आणि आग होणे अशा वेदनादायक तक्रारी सुरू होतात(almond oil for dry skin in winter).

या कोरड्या आणि रुक्ष त्वचेला पोषण देऊन तिला पुन्हा मऊ, मुलायम आणि तजेलदार करण्यासाठी एक खास घरगुती उपाय म्हणजे बदामाचे तेल. व्हिटॅमिन-ई, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी अ‍ॅसिडयुक्त असलेले बदाम तेल हे फक्त एक नैसर्गिक मॉइश्चरायझर नाही, तर ते त्वचेच्या दुरुस्तीसाठी आणि संरक्षणासाठी फायदेशीर ठरते. बदाम तेल त्वचेला खोलवर पोषण देते, कोरडेपणा दूर करते आणि त्वचा मऊ, चमकदार व हेल्दी ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी (Right Way to Use Almond Oil on Face to Reduce Dryness During Winters) आणि तिला नैसर्गिकरित्या चमकदार ठेवण्यासाठी बदाम तेलाचा योग्य वापर कसा करावा ते पाहूयात... 

हिवाळ्यात त्वचेच्या समस्यांसाठी बदाम तेल असरदार... 

हिवाळ्यात जेव्हा कोरड्या, निस्तेज आणि फाटलेल्या त्वचेची समस्या येते, तेव्हा बदाम तेल एक नैसर्गिक आणि घरगुती उपाय म्हणून फायदेशीर ठरते. या बदाम  तेलाचा आपण तीन पद्धतींनी त्वचेसाठी वापर करु शकतो. 

१. बदाम तेल :- चेहरा किंवा त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तळहातावर बदामाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब घ्या. हे तेल चेहऱ्यावर आणि मानेला हलक्या हातांनी गोलाकार पद्धतीने लावू मसाज करा. ज्या भागातील त्वचा कोरडी पडली आहे त्या भागांवरह देखील लावा. रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेल लावून रात्रभर तसेच त्वचेवर  ठेवून द्यावे. तुमची त्वचा तेलकट असल्यास, तेल लावून अर्ध्या तासानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकू शकता.

शिळ्या भातानं चमकेल त्वचा, ५ प्रकारे लावा भाताचा पॅक-काचेसारखी कोरियन त्वचा मिळण्याचा सोपा उपाय...

२. बदाम तेलाचे टोनर :- बदाम तेलाच्या वापरासोबतच आपण बदाम तेलाचे खास घरगुती टोनर देखील तयार करु शकता. बदल तेलाचे घरगुती नैसर्गिक टोनर तयार करण्यासाठी आपल्याला बदामाचे तेल, खोबरेल तेल, गुलाबपाणी, व्हिटामिन 'ई' कॅप्सूल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. टोनर बनवण्यासाठी, सर्वप्रथम एका छोट्या वाटीत बदाम तेल काढून घ्या. आता या तेलात  खोबरेल तेल, गुलाबपाणी आणि व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल मिसळा. हे सर्व घटक चांगल्या प्रकारे एकत्रित मिक्स करून घ्या, जेणेकरून ते एकजीव होतील. आता हे मिश्रण स्प्रे बॉटल किंवा हवाबंद डबीत भरून ठेवा. हा होममेड टोनर बनवून तयार आहे.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचेे लग्नासाठी खास सुंदर ब्लाऊज, पाठीवरच्या नक्षीत सुखी संसाराची खास गोष्ट...

३. बदाम तेलाचे मॉइश्चरायझर :- एका वाटीत २ मोठे चमचे बदाम तेल घ्या. यामध्ये १ मोठा चमचा एलोवेरा जेल आणि १/२ चमचा ग्लिसरीन घाला. हे मिश्रण चमच्याने किंवा लहान व्हिस्कने  चांगल्या प्रकारे फेटून घ्या. हे मिश्रण जेवढे अधिक फेटाल, तेवढे ते क्रीमी आणि एकजीव होईल. तयार झालेले मॉइश्चरायझर एका हवाबंद डबीत किंवा लहान बरणीत भरून ठेवा. हे मॉइश्चरायझर दिवसातून दोनदा वापरू शकता. अंघोळीनंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर, त्वचा थोडीशी ओलसर असताना हे थोडेसे मॉइश्चरायझर हातावर घेऊन चेहऱ्यावर आणि शरीराच्या कोरड्या भागांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. बदाम तेल आणि ग्लिसरीनमुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहील आणि एलोवेरा जेलमुळे त्वचा शांत होईल.

त्वचेसाठी बदाम तेलाचे फायदे... 

१. बदाम तेल हलके असल्याने ते त्वचेत लवकर शोषले जाते. यामुळे त्वचा मऊ, मुलायम आणि तजेलदार होते.
२. बदाम तेलात असलेले व्हिटॅमिन 'ई' हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. हे घटक त्वचेवरील सुरकुत्या आणि अकाली दिसणाऱ्या वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यास मदत करतात.
३. बदाम तेलामध्ये ओमेगा- ३ आणि ओमेगा- ६ फॅटी अ‍ॅसिड तसेच व्हिटॅमिन 'ई' मुबलक प्रमाणात असतात. हे घटक त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता शोषून घेतात आणि ती दीर्घकाळ लॉक करून ठेवतात.
४. थंडीमुळे त्वचेला येणारा कोरडेपणा, खाज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी हे तेल अत्यंत उपयुक्त आहे.

Web Title : सर्दियों में मुलायम त्वचा के लिए बादाम तेल: एक गाइड।

Web Summary : सर्दियों में बादाम तेल से रूखेपन से लड़ें। यह त्वचा को पोषण देता है, मरम्मत करता है और सुरक्षा करता है। इसे सीधे, टोनर के रूप में (नारियल तेल और गुलाब जल के साथ), या मॉइस्चराइजर में (एलोवेरा और ग्लिसरीन के साथ) मुलायम, स्वस्थ त्वचा के लिए उपयोग करें।

Web Title : Almond oil for soft, wrinkle-free skin in winter: A guide.

Web Summary : Combat winter dryness with almond oil. It nourishes, repairs, and protects skin. Use it directly, as a toner (with coconut oil and rosewater), or in a moisturizer (with aloe vera and glycerin) for soft, healthy skin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.