Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात केस खूप जास्त गळतात? जाणून घ्या, केस धुण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:21 IST

हिवाळ्यात केस गळण्याचं प्रमाण अनेकदा वाढतं.

हिवाळ्यात केस गळण्याचं प्रमाण अनेकदा वाढतं. याचं कारण म्हणजे हिवाळ्यातील कोरडी हवा आणि आंघोळीसाठी वापरलं जाणारं गरम पाणी. अशा परिस्थितीत केसगळती कमी करण्यासाठी केसांची योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचवेळी, केसांची निगा राखण्याच्या दिनचर्येतील पहिलं काम, म्हणजे केस धुणं, हे नीट केलं नाही, तर केसगळती वाढू शकते. अशा परिस्थितीत, केस धुण्याची योग्य पद्धत कोणती हे जाणून घेऊया...

केस धुण्याची योग्य पद्धत

केस धुण्यापूर्वी तेल लावणे

केसांमध्ये पौष्टिकतेची कमतरता असेल आणि केस कोरडे दिसत असतील तर केस धुण्यापूर्वी डोक्याला तेलाने मालिश करता येतं. तेल मसाजसाठी खोबरेल तेल किंवा बदाम तेल हलकं गरम करा. या तेलाने डोक्याला मुळापासून टोकापर्यंत मसाज करा. एक ते दीड तास तेल लावल्यानंतर केस धुवून स्वच्छ करा.

पाण्याचं तापमान चेक करा

लक्षात ठेवा की, ज्या पाण्याने तुम्ही केस धूत आहात ते जास्त गरम नसावं. जास्त गरम पाण्याने केस धुतल्याने केसगळती वाढते. तसेच त्यामुळे केस खराब होऊन, कमकुवत होऊन तुटायला लागतात.

कंडिशनर लावा

जर तुमचे केस लांब आणि जास्त गुंतलेले असतील तर कंडिशनर लावा आणि त्यानंतर केस धुवा. यामुळे केस धुतल्यानंतर ते विचारल्यावर कंगव्यात अडकून तुटत नाही.

हेअर मास्क लावू शकता

केस धुण्यापूर्वी आठवड्यातून एकदा केसांवर हेअर मास्क लावता येतो. हेअर मास्क स्काल्पपासून ते केसांच्या मुळांपर्यंत आर्द्रता प्रदान करतो. हिवाळ्याच्या कोरड्या हवेने प्रभावित झालेल्या कोरड्या केसांना यामुळे पोषण मिळतं.

योग्य शाम्पू वापरा

केस गळणे कमी करण्यासाठी, योग्य शाम्पू वापरणं देखील महत्त्वाचं आहे. तुमच्या केसांच्या प्रकारानुसार शाम्पू निवडा. जर शाम्पू तुमच्या केसांनुसार नसेल तर ते केस गळणे कमी होण्याऐवजी वाढवू शकतं.

केस धुताना विशेष काळजी घ्या

जेव्हा तुम्ही केसांना शाम्पू लावता आणि केस धुता तेव्हा ते जास्त घासत बसू नका. खूप घासल्यामुळे केस कमकुवत होतात आणि त्यामुळे ते लवकर तुटतात. म्हणूनच केस हलक्या हातांनीच धुवा.  

टॅग्स :केसांची काळजीथंडीत त्वचेची काळजी