Join us

केस फार विरळ झालेत? 'या' पद्धतीनं तांदळाचं पाणी केसांना लावा; लांबसडक-दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 14:24 IST

Rice water for hair : तांदळाचं पाणी त्वचा आणि केसांवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लावू शकता. यामुळे केस वाढतील आणि पुरेपूर पोषण मिळेल.

तांदळाचे पाणी केसांना वेगवेगळ्या प्रकारे लावले जाते. या पाण्याचे अनेक फायदे आहेत जसं की तांदळाच्या पाण्याने केसांच्या वाढ होते. (Rice Water for Hair Growth) याशिवाय केस मऊ-मुलायम राहण्यास मदत होते. तांदळाचं पाणी त्वचा आणि केसांवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लावू शकता. यामुळे केस वाढतील आणि पुरेपूर पोषण मिळेल. (Rice water for hair Benefits and how to use it)

तांदळाच्या पाण्याचा हेअर मास्क

तांदळाच्या पाण्याचा हेअर मास्क बनवण्याासाठी सगळ्यात आधी तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर तांदूळ पाण्यात भिजवून वेगळ्या भांड्यात ठेवा. पाणी अर्धा  ते एक तासासाठी भिजवलेले राहू द्या. त्यानंतर तांदळाचं पाणी केसांवर लावण्यासाठी तयार असेल. हे पाणी गाळून वेगळे ठेवा. 

तांदळाचं पाणी अर्ध्या तासासाठी केसांवर लावून ठेवा. हे पाणी शॅम्पू लावण्याआधी केसांवर लावा.  शॅम्पूने  केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग करण्यासाठीसुद्धा तांदळाचे पाणी उत्तम पर्याय आहे. शॅम्पू वापरल्यानंतर केसांना शाईन येण्यासाठीही  तांदळाच्या पाण्याचा केसांवर वापर केला  जातो.

प्रेग्नंसीनंतर पोट खूपच सुटलं? तज्ज्ञांचा सल्ला, पोट कमी करण्यासाठी करुन पाहा १ उपाय

तांदळाचे पाणी आणि याओ महिला

चीनच्या हुआंग्लुओ (Huangluo Village)  गावातील महिला आपल्या  केसांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. या गावात याओ महिला राहतात. या महिलांचे केस पायांपर्यंत (Yao Women) लांब आहेत. लांब  केसांसाठी या गावातील महिलांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आले आहे. या गावातील महिला तांदळाच्या पाण्यानं केस धुतात. म्हणूनच त्यांचे केस, दाट आणि चमकदार असतात.  महिला फर्मेंटेड  राईस वॉटर आपल्या केसांना लावतात.

या प्रकारचे केसांचे पाणी बनवण्यासाठी पांढरे तांदूळ, पॉमेलो पील्स, टी ब्रान आणि पाण्याची आवश्यकता असते. एक कप तांदूळ २ कप पाण्यासह मिसळा. अर्धा तास तसंच ठेवल्यानंतर तांदूळ गाळून पाणी वेगळं करा. यात पॅमेलो किंवा सिट्रस फळांच्या रसाचे काही थेंब घाला.  त्यात ३ चमचे चहा  मिसळा.  पाणी ५ मिनिटांसाठी उकळा आणि नंतर थंड करायला ठेवा. नंतर हे पाणी तुम्ही काचेच्या भांड्यात घालू शकता.  केस धुण्याआधी केसांना हे पाणी हेअर मास्कप्रमाणे लावा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स