Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केसांचा झाडू झाला-बेकार गळतात? शॅम्पूत हा घरगुती पदार्थ मिसळून केस धुवा, घनदाट होतील केस

केसांचा झाडू झाला-बेकार गळतात? शॅम्पूत हा घरगुती पदार्थ मिसळून केस धुवा, घनदाट होतील केस

Rice Shampoo Hack Ger Salon Like Hair At Home : तांदळाच्या पाण्यात भरपूर व्हिटामीन्स आणि एमिनो एसिड्स असतात ते केसांची वाढ चांगली होण्यासाठी मदत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:29 IST2026-03-30T15:39:39+5:302026-03-31T18:29:36+5:30

Rice Shampoo Hack Ger Salon Like Hair At Home : तांदळाच्या पाण्यात भरपूर व्हिटामीन्स आणि एमिनो एसिड्स असतात ते केसांची वाढ चांगली होण्यासाठी मदत करतात.

Rice Shampoo Hack Ger Salon Like Hair At Home For Free Rice Water Shampoo | केसांचा झाडू झाला-बेकार गळतात? शॅम्पूत हा घरगुती पदार्थ मिसळून केस धुवा, घनदाट होतील केस

केसांचा झाडू झाला-बेकार गळतात? शॅम्पूत हा घरगुती पदार्थ मिसळून केस धुवा, घनदाट होतील केस

पुरातन काळापासून तांदळाच्या पाण्याला सुंदरता वाढवणारा उपाय म्हणून वापरले जाते. पण तुम्ही कधी तांदळाच्या शॅम्पूबद्दल ऐकलंय का. तांदळाचा हा उपाय तुमच्या निर्जीव, निस्तेज केसांना नवीन चमक देऊन मजबूत बनवू शकतो. केस झाडूसारखे झाले असतील किंवा तुम्ही वेगवेगळी उत्पादनं वापरून थकला असाल तर हा उपाय  खूप कामाचा आहे. (Hair Care Tips)

नॅचुरोपॅथी फिजिशनिय डॉक्टर नवनीर कौर भाटिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या  म्हणण्यांनुसार तांदळाचे पाणी केसांच्या मुळांना मजबूत बनवते तसंच केसांना रेशमी आणि मुलायमही बनवते. राईस शॅम्पू हॅकबद्दल या लेखात समजून घेऊ. (Rice Shampoo Hack Ger Salon Like Hair At Home)

हा शॅम्पू कसा बनवायचा?

एका वाटी थोडे तांदूळ घ्या. यात तुमचा नेहमीचा शॅम्पू आणि थोडं पाणी मिसळा. रात्रभरासाठी हे मिश्रण झाकून ठेवा. रात्रभर भिजवल्यामुळे तांदळाचे सर्व पोषक तत्व शॅम्पूच्या पाण्यात मिसळतात. दुसऱ्या दिवशी हे पाणी केसांना लावून हलक्या हातानं मसाज करा.

तांदळाच्या पाण्यात भरपूर व्हिटामीन्स आणि एमिनो एसिड्स असतात ते केसांची वाढ चांगली होण्यासाठी मदत करतात.  या पाण्यामुळे केस मऊ होतात आणि हेल्दी, शायनी दिसतात. तांदळाचं पाणी केसांचा कोरडेपणा कमी करते.  या पाण्यामुळे केसांना पोषण मिळते.

चांगल्या परिणामांसाठी फर्मेंटेड राईस  वॉटरचा वापर करा.  जर तुमचे केस खूपच कोरडे असतील तर राईस शॅम्पूच्या मिश्रणात अर्धा चमचा नारळाचं तेल, एलोवेरा जेल मिसळू शकता. यामुळे तुमचे केस जास्त हायड्रेट राहतील.

केसांना कंडीशनिंग करण्यासाठीही तुम्ही तांदळाचं पाणी वापरू शकता. यासाठी २ चमचे एलोवेरा जेलमध्ये १ चमचा राईस वॉटर आणि बदामाचं तेल घालून व्यवस्थित एकजीव करा.नंतर ३० ते ४५ मिनिटं केसांना असंच लावलेलं राहू द्या. मग साध्या पाण्यानं केस धुवा. केसांना पोषणाची आवश्यकता असते. तांदळाच्या पाण्यात रोजमेरी तेलाचे काही थेंब घातल्यास केस चांगले राहतात. हे टोनर रोज  झोपण्याआधी केसांना लावून मसाज केल्यास केसांची वाढ होण्यास मदत होईल.

Web Title : चावल के पानी का शैम्पू: मजबूत, चमकदार बालों के लिए आसान उपाय।

Web Summary : चावल के पानी के शैम्पू से बेजान बालों को बदलें! यह आसान घरेलू उपाय जड़ों को मजबूत करता है, चमक बढ़ाता है और स्वस्थ बालों के विकास को बढ़ावा देता है। नारियल तेल या एलोवेरा के साथ अनुकूलित करें।

Web Title : Rice water shampoo for strong, shiny hair: A simple DIY guide.

Web Summary : Transform dull hair with rice water shampoo! This easy homemade remedy strengthens roots, adds shine and promotes healthy hair growth. Customize with coconut oil or aloe vera for added hydration.