चेहऱ्यावरील पिंपल्स गेल्यानंतरही त्वचेवर राहिलेले काळे व हट्टी डाग आणि निस्तेजपणा अनेकदा जाता जात नाही. त्वचेवरील या पिंपल्सच्या डागांमुळे चेहऱ्याचा संपूर्ण लूक व सौंदर्य बिघडते. त्वचेवरील पिंपल्सचे काळे व हट्टी डाग घालवण्यासाठी आपण अनेकदा महागडे उपचार करतो. कित्येकदा त्वचेवरील हे काळे डाग न जाता, त्वचेला हवा तसा ग्लो येत नाही. परंतु त्वचेवर कोरियन महिलांप्रमाणेच 'काचेसारखी चमक' हवी असेल आणि पिंपल्सच्या डागांपासून मुक्ती मिळवायची असेल तर, तांदुळाचे पीठ फायदेशीर ठरते. तांदुळाचे पीठ हे त्वचेसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. व्हिटॅमिन-बी, अँटीऑक्सिडंट्स आणि त्वचा उजळवणाऱ्या नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेले तांदुळाचे पीठ त्वचेला नैसर्गिक चमकदारपणा देऊ शकते(rice flour face pack for pimples).
आपल्या घरातील साधं तांदुळाचं पीठ आणि त्यात मिसळलेले फक्त दोन खास नैसर्गिक पदार्थ त्वचेला नॅचरल ग्लो देऊ शकतात. तांदुळाच्या पिठात असलेले स्किन-लाइटनिंग गुणधर्म आणि काही घरगुती घटक एकत्र आल्यावर तयार होणारा फेसपॅक त्वचेवरील पिंपल्सचे डाग, तेलकट आणि काळेपणा कमी करून चेहऱ्याला उजळ, गुळगुळीत आणि तजेलदार करतो. त्वचेवरील (homemade rice flour face pack) पिंपल्सचे काळे डाग व नॅचरल ग्लो येण्यासाठी तांदुळाचा फेसमास्क कसा तयार करायचा ते पाहूयात...
फक्त २ मिनिटांत तयार करा तांदुळाच्या पिठाचा फेसमास्क...
हा फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य घरच्याघरीच सहज मिळू शकते. यासाठी एक मोठा चमचा तांदुळाचे पीठ, एक मोठा चमचा अॅलोवेरा जेल आणि एक मोठा चमचा गुलाबपाणी लागेल. तांदुळाच्या पिठामुळे त्वचेवरील घाण आणि डेड स्किनचे प्रमाण कमी होते, तर अॅलोवेरा जेल त्वचेला थंडावा आणि आर्द्रता देते. गुलाबपाणी त्वचेचा pH संतुलित ठेवते तसेच त्वचेला मऊपणा आणि नैसर्गिक सुगंध देते.
घरगुती फेसपॅक वापरण्याची पद्धत :-
सर्वप्रथम गरम पाण्याने चेहरा धुवून घ्या. त्यानंतर एक चमचा तांदुळाच्या पिठात, अॅलोवेरा जेल मिसळा आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करा. हा नैसर्गिक स्क्रब त्वचेवरील डेड स्किन, तेलकटपणा आणि घाण काढून टाकतो. नियमित वापर केल्यास त्वचा उजळते आणि ब्लॅकहेड्स, टॅनिंग यांची समस्या कमी होते.
केसांना हेअर डाय लावून विकत घेताय कॅन्सरचं दुखणं! १ चूक पडेल महागात - वेळीच व्हा सावध...
स्क्रब केल्यानंतर उरलेल्या मिश्रणात गुलाबपाणी घालून पातळ अशी पेस्ट तयार करा आणि ती चेहऱ्यावर फेसपॅक म्हणून लावा. १५ ते २० मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक त्वचेला पोषण देतो, पिंपल्सचे डाग कमी करतो आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो.
फेसपॅक काढल्यानंतर त्वचा थोडी कोरडी वाटू शकते, त्यामुळे त्वचेवर हलके मॉइश्चरायझर किंवा थोडं अॅलोवेरा जेल लावणं आवश्यक असते. यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो, कोरडेपणा येत नाही आणि चेहऱ्याचा मऊपणा व नैसर्गिक चमक दिवसभर टिकून राहते.
