Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून गेली? 'या' पद्धतीने राईस फेशियल करा- टॅनिंग जाऊन चेहऱ्यावर येईल ग्लो

उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून गेली? 'या' पद्धतीने राईस फेशियल करा- टॅनिंग जाऊन चेहऱ्यावर येईल ग्लो

How to Do Rice Facial?: कोरियन फेशियल केल्यासारखा ग्लो घरबसल्या हवा असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहाच..(4 step rice facial for glowing skin)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2026 14:26 IST2026-04-04T14:25:29+5:302026-04-04T14:26:14+5:30

How to Do Rice Facial?: कोरियन फेशियल केल्यासारखा ग्लो घरबसल्या हवा असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहाच..(4 step rice facial for glowing skin)

rice facial at home, how to do rice facial at home, 4 step rice facial for glowing skin | उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून गेली? 'या' पद्धतीने राईस फेशियल करा- टॅनिंग जाऊन चेहऱ्यावर येईल ग्लो

उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून गेली? 'या' पद्धतीने राईस फेशियल करा- टॅनिंग जाऊन चेहऱ्यावर येईल ग्लो

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांत त्वचेची थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते. कारण कडक उन्हामुळे त्वचा खूप टॅन होते. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळलं तरी सकाळी किंवा संध्याकाळी ५ नंतरही खूप ऊन असतं. या उन्हात बाहेर गेल्याने त्वचेवर परिणाम होतो आणि टॅनिंग वाढतं. शिवाय धूळ, प्रदुषणही आहेच. या सगळ्यांचा परिणाम होऊन त्वचा काळवंडून जाते. अशा टॅन झालेल्या त्वचेला पुन्हा एकदा छान लूक द्यायचा असेल तर पुढे सांगितल्याप्रमाणे घरच्याघरी राईस फेशियल करून पाहा (How to Do Rice Facial?). काही मिनिटांतच अगदी मस्त चमकदार त्वचा मिळेल.(4 step rice facial for glowing skin) 

ग्लोईंग त्वचेसाठी राईस फेशियल कसं करायचं?

 

२ चमचे तांदळाचं पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा कच्चं दूध घाला. आता या मिश्रणात कापूस बुडवा आणि त्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवरची सगळी घाण, धूळ, मळ निघून जाण्यास मदत होईल.

चेहरा गुबगुबीत- सुजलेला दिसतो? ५ ट्रिक्स, काही दिवसांतच चेहरा होईल रेखीव- मिळेल परफेक्ट जॉ लाईन 

वरील पद्धतीने चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेला स्क्रब करा. यासाठी तांदळाचं पीठ आणि कॉफी पावडर समप्रमाणात एकत्र करा. त्यात थोडे गुलाबजल घालून त्याचा लेप करा. आता हा लेप चेहऱ्यावर चोळा. या स्क्रबमुळे त्वचेवरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल.

 

यानंतर १ चमचा राईस वॉटर, १ चमचा बीटरुटचा रस आणि १ चमचा ॲलोव्हेरा जेल एकत्र करा आणि त्याने २ मिनिटांसाठी चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेला छान पोषण मिळतं आणि ती मऊ, कोमल होते. त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

बॉडी डिटॉक्स करणारे ५ पदार्थ, शरीरातली घाण बाहेर फेकली जाऊन राहाल निरोगी, चेहऱ्यावर येईल तेज

यानंतर चेहऱ्यासाठी आता सुपर ग्लो देणारा एक मास्क तयार करा. हा मास्क तयार करण्यासाठी शिजवलेला भात घ्या आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करा. आता भाताच्या पेस्टमध्ये १ चमचा मध घाला. हा लेप चेहऱ्याला लावा आणि १० ते १२ मिनिटांनी लेप सुकत आला की हलक्या हाताने चोळून काढा. चेहऱ्यावर छान ग्लो येईल. 

 

Web Title : धूप से त्वचा काली हो गई? इस तरीके से करें राइस फेशियल, पाएं ग्लोइंग स्किन

Web Summary : गर्मी में टैनिंग से परेशान हैं? घर पर करें राइस फेशियल। चावल के पानी से धोएं, स्क्रब करें, और एलोवेरा, चुकंदर के रस से मसाज करें। चावल और शहद का मास्क लगाएं और पाएं चमकदार त्वचा।

Web Title : Rice facial for tan removal and glowing skin this summer.

Web Summary : Suffering from tanned skin this summer? Try this simple rice facial at home. Cleanse, scrub, massage with rice water, beetroot juice and aloe vera. Apply rice and honey mask. Get glowing skin in minutes.