अंडरआर्म्सचा काळेपणा ही प्रत्येकीला सतावणारी फारच कॉमन समस्या आहे. अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे आपल्याला हवे तसे मनासारखे कपडे घालताना लाजिरवाणे वाटते, शक्यतो अनेकजणी (remedy to remove underarm blackness) या समस्येमुळे स्लिव्हलेस घालणं देखील (how to get rid of dark underarms) सोडून देतात. सतत भरपूर घाम येणे, गरजेपेक्षा अधिक डिओड्रंट किंवा हेअर रिमूव्हल क्रीमचा वापर, तसेच त्वचेची योग्य निगा न राखल्याने अंडरआर्म्स काळे पडू (underarm darkness treatment at home) लागतात. त्वचेचा रंग फक्त चेहऱ्यापुरताच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घेणं तितकंच गरजेचं असत( natural remedies for dark underarms).
अनेकदा आपण काखेतील काळेपणा काढण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या क्रीम्स किंवा ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. इतकंच काय तर अनेकदा पार्लरला जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट्स देखील घेतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स किंवा ट्रीटमेंट्स अनेकदा वारंवार करणं शक्य नसतं अशावेळी आपण घरगुती उपाय देखील करु शकतो. अंडरआर्म्स मधील काळेपणा घालवणे तितकेसे सोपे नाही. जर आपल्याला अंडरआर्म्स मधील काळेपणा घालवण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करायचा नसेल तर, स्वयंपाक घरातील काही पदार्थ फायदेशीर ठरतील. स्वयंपाक घरातील काही नेहमीच्या वापरातील पदार्थांनी हा काळेपणा हळूहळू घालवता येऊ शकतो. पण हे पदार्थ नेमके कोणते ? यामुळे काखेतला काळेपणा दूर होऊ शकतो का? ते पाहूयात...
अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय vaidupender यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. काखेतील काळेपणा घरच्याघरीच घरगुती उपायांनी दूर करण्यासाठी आपल्याला स्वयंपाक घरातील काही मोजक्याच पदार्थांची गरज लागणार आहे. स्वयंपाक घरातील प्रत्येकी १ चमचा हळद, बेसन, टोमॅटोचा रस आणि दूध इतके चार पदार्थ पुरेसे आहेत.
डिंपल कपाडियाचे केस साठीतही दिसतात अत्यंत सुंदर, पाहा तिनं सांगितलेले घरगुती सोपे उपाय...
नेमका उपाय काय आहे ?
काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय करताना सगळ्यांतआधी एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ चमचा हळद, बेसन, टोमॅटोचा रस आणि दूध असे चारही पदार्थ एकत्रित करुन त्यांची पेस्ट तयार करुन घ्यावी. त्यानंतर ही तयार पेस्ट काखेत लावून हलकेच २ ते ३ मिनिटे मसाज करुन घ्यावा. मग १० ते १५ मिनिटे ही पेस्ट त्वचेवर तशीच लावून ठेवून द्यावी. मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आठवड्यातून किमान २ वेळा महिनाभर हा उपाय केल्यास काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत मिळते.
Nag Panchami 2025 : नागपंचमीला मेहेंदी लावण्याची परंपरा, केमिकलशिवाय मेहेंदी रंगण्यासाठी ५ टिप्स!
हा उपाय करण्याचे फायदे...
१. हळद :- हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि त्वचा उजळवणारे गुणधर्म त्वचेला नैसर्गिक चमक देतात.२. बेसन :- बेसन त्वचेवरील डेड स्किन काढून स्किन टोन उजळ करण्यास मदत करते. ३. टोमॅटोचा रस :- टोमॅटोमधील अँटीऑक्सिडंट्स आणि लायकोपीन त्वचेवरील काळसरपणा कमी करण्यात मदत करतात.४. दूध :- दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेचं सौम्य एक्सफोलिएशन करतं आणि ती मऊ व उजळ करते.