टेनिसच्या मैदानात आपल्या ताकदीने प्रतिस्पर्ध्यांना घाम आणणारी 'टेनिस क्वीन' सानिया मिर्झा, मैदानाबाहेर तिच्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस लूकने नेहमीच तिच्या फॅन्सना घायाळ करते. वय वाढत असलं तरी सानियाच्या त्वचेवरचा तो 'नॅचरल ग्लो' आणि तजेलदारपणा पाहून अनेकांना प्रश्न पडतो की, इतक्या कडक ऊन्हांत तासंतास प्रॅक्टिस करूनही तिची त्वचा इतकी सुरक्षित आणि टवटवीत कशी? अलीकडेच सानियाच्या या सौंदर्यामागचं एक मोठं सिक्रेट समोर आलं आहे आणि ते म्हणजे - 'रेड लाईट थेरपी' (Red Light Therapy)!
अलीकडे सानियाच्या स्किनकेअर रुटीनमधील रेड लाईट थेरपी हा ट्रेंड विशेष लोकप्रिय झाला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि स्किन एक्स्पर्ट्स त्वचा तरुण, टवटवीत आणि निरोगी ठेवण्यासाठी या आधुनिक उपचारपद्धतीचा वापर करत आहेत.सानिया मिर्झाच्या स्किन केअर रुटीनमध्ये अत्यंत (red light therapy for skin care & hair growth) महत्त्वाच्या ठरलेल्या या रेड लाईट थेरपीचा नेमका अर्थ काय, ती त्वचेवर कशी जादू करते आणि सामान्य लोकांसाठी ती किती फायदेशीर आहे (Sania Mirza red light therapy) इतकंच नाही तर हा नवा 'ब्यूटी ट्रेंड' काय आहे ते पाहूयात...
रेड लाईट थेरपी म्हणजे नेमकं काय ?
रेड लाईट थेरपी ही एक नॉन - इनवेसिव्ह (त्वचेला इजा न करणारी) स्किन ट्रीटमेंट आहे. या प्रक्रियेमध्ये विशिष्ट लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर केला जातो. हा प्रकाश त्वचेच्या आतल्या थरांपर्यंत पोहोचून पेशींना अॅक्टिव्ह करतो. त्यामुळे त्वचेमध्ये कोलेजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. कोलेजन हे स्किन टाईटनिंग, स्मूथ आणि तरुण दिसण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रोटीन मानले जाते.
या थेरपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्वचेची नैसर्गिक रिपेअर प्रक्रिया वेगवान होते. रेड लाईट त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते. त्यामुळे डल स्किन, फाइन लाइन्स, सुरकुत्या आणि पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते. नियमितपणे ही थेरपी घेतल्यास त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो, म्हणूनच अनेक सेलिब्रिटी आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये या रेड लाईट थेरपीचा समावेश करतात.
केस गळणं थांबून केस लागतील चमकायला, पाहा घरगुती जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर-लांबसडक केसांचं सिक्रेट...
रेड लाईट थेरपीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती वेदनारहित आणि सुरक्षित मानली जाते. यात सुई, केमिकल्स किंवा सर्जरीचा वापर नसतो. त्यामुळे त्वचेवर साइड इफेक्ट्स होण्याची शक्यता कमी असते. काही लोक ही थेरपी पिंपल्स, सूज किंवा त्वचेवरील लालसरपणा कमी करण्यासाठीही घेतात. मात्र, प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्यामुळे ही ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ही थेरपी कशी कार्य करते ?
जेव्हा लाल प्रकाश आपल्या त्वचेवर पडतो, तेव्हा तो पेशींमधील 'मायटोकॉन्ड्रिया' (Mitochondria) म्हणजेच पेशींच्या ऊर्जा केंद्राला उत्तेजित करतो. यामुळे पेशींना अधिक ऊर्जा मिळते आणि त्या वेगाने स्वतःची दुरुस्ती करू लागतात. यामुळे त्वचेमध्ये कोलेजन (Collagen) निर्मितीची प्रक्रिया वेगवान होते. कोलेजन हे असे प्रथिन आहे जे त्वचेला घट्ट आणि तरुण ठेवण्यास मदत करते. ही थेरपी घेताना तुम्हांला किमान १० ते ३० मिनिटे एका विशिष्ट प्रकारच्या लाल लाईट खाली बसावे लागते. त्वचेसोबतच केसांसाठी देखील ही 'रेड लाईट थेरपी' अतिशय फायदेशीर ठरते.
रेड लाईट थेरपीचे मुख्य फायदे :-
१. अँटी-एजिंग :- वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी ही थेरपी अत्यंत फायदेशीर असते.
२. मुरुम आणि डाग घालवते :- त्वचेवरील जळजळ कमी करून मुरुमांचे डाग फिके करण्यासाठी याचा वापर होतो.
३. त्वचेचे टेक्श्चर सुधारणे :- या प्रकाशामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा अधिक निरोगी आणि ग्लोइंग दिसते.
४. जखम भरणे :- ही रेड लाईट थेरपी केवळ सौंदर्यासाठी नाही, तर जखमा वेगाने भरून काढण्यासाठी आणि त्वचेची सूज कमी करण्यासाठी देखील वापरली जाते.
ही थेरपी सुरक्षित आहे का?
रेड लाईट थेरपी ही पूर्णपणे सुरक्षित मानली जाते कारण यामध्ये सूर्याच्या अतिनील (UV) किरणांसारखे हानिकारक किरण नसतात. यात उष्णता नसते, त्यामुळे त्वचा जळण्याची भीती नसते. मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा योग्य उपकरणांच्या मदतीनेच ही थेरपी घेणे गरजेचे आहे.
