Lokmat Sakhi >Beauty > त्वचेवर ॲक्ने का येतात? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ खास उपाय- ॲक्ने जाऊन सोन्यासारखी चमकेल त्वचा

त्वचेवर ॲक्ने का येतात? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ खास उपाय- ॲक्ने जाऊन सोन्यासारखी चमकेल त्वचा

Ayurvedic Remedies For Reducing Acne And Breakouts Of Skin: त्वचेवर ॲक्ने, ब्रेकआऊट्स असा त्रास दिसून येत असेल तर आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला एकदा वाचा...(reasons for acne)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 11:07 AM2024-06-24T11:07:34+5:302024-06-24T11:08:17+5:30

Ayurvedic Remedies For Reducing Acne And Breakouts Of Skin: त्वचेवर ॲक्ने, ब्रेकआऊट्स असा त्रास दिसून येत असेल तर आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला एकदा वाचा...(reasons for acne)

reasons for acne, how to reduce acne on skin, ayurvedic remedies for reducing acne and breakouts of skin | त्वचेवर ॲक्ने का येतात? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ खास उपाय- ॲक्ने जाऊन सोन्यासारखी चमकेल त्वचा

त्वचेवर ॲक्ने का येतात? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ खास उपाय- ॲक्ने जाऊन सोन्यासारखी चमकेल त्वचा

Highlightsहे काही उपाय केल्यास त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येईल आणि काही दिवसांतच ॲक्नेचा त्रास कमी होऊन त्वचा छान चमकून उठेल. 

काही जणींच्या चेहऱ्यावर खूप जास्त ॲक्ने, पिगमेंटेशन, ब्रेकआउट्स दिसून येतात. त्याउलट काही जणींचा चेहरा मात्र अगदी स्वच्छ, नितळ असतो. स्किनकेअर रुटीन सारखंच असलं तरी अशा पद्धतीचा भेद त्वचेवर का दिसून येतो, हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. म्हणूनच याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी एक खास सल्ला दिला आहे. आयुर्वेदानुसार कफ, पित्त आणि वात अशा ३ प्रकारच्या प्रकृती असणारे लोक असतात (reasons for acne). त्यापैकी जे लोक पित्त प्रकृतीचे असतात, अशा लोकांच्या चेहऱ्यावर इतर लोकांच्या तुलनेत जास्त ॲक्ने, ब्रेकआऊट्स आणि पिगमेंटेशन दिसून येतात. म्हणूनच अशा लोकांनी चेहऱ्याची थोडी खास पद्धतीने काळजी घेतली पाहिजे.(ayurvedic remedies for reducing acne and breakouts of skin)

 

चेहऱ्यावरील ॲक्ने कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

पित्त प्रकृतीच्या लोकांनी चेहऱ्यावरचे ॲक्ने, पिगमेंटेशन आणि ब्रेकआऊट्स कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

स्मृती इराणींना आवडतं आईस्क्रिम घालून केलेलं अहमदाबादचं प्रसिद्ध पायनॅपल सॅण्डविच, बघा खास रेसिपी

यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की या लोकांची त्वचा थोडी ओलसर आणि लालसर दिसणारी असते. अशा लोकांनी त्वचेची काळजी खूप हळूवार पद्धतीने घेतली पाहिजे. 

यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे चेहऱ्यावर ॲक्ने असणाऱ्या पित्त प्रकृतीच्या लोकांनी खस, गुलाब किंवा चंदन असणाऱ्या पदार्थांनी चेहरा धुण्यास प्राधान्य द्यावे. हे तिन्ही पदार्थ त्यांच्या त्वचेसाठी खूप पोषक ठरतात. तसेच चेहरा धुतल्यानंतर तो माॅईश्चराईज करण्यासाठी एखादं कोरफड असणारं हायड्रेटींग मॉईश्चरायझर लावावं.

 

तसेच या लोकांनी स्क्रब जास्त करू नये. आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळाच स्क्रबिंग करावं. आणि त्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबजल असणारं एखादं स्क्रब वापरल्यास अधिक उत्तम.

गोकर्णाचा वेल वाढला तरी फुलंच येत नाहीत? २ सोपे उपाय- एवढी फुलं येतील की वेचून दमाल...

तसेच या लोकांनी आहारात मनुका, तूप आणि जवसाच्या बिया हे पदार्थ दररोज नियमितपणे घेतलेच पाहिजेत. हे काही उपाय केल्यास त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येईल आणि काही दिवसांतच ॲक्नेचा त्रास कमी होऊन त्वचा छान चमकून उठेल. 

 

Web Title: reasons for acne, how to reduce acne on skin, ayurvedic remedies for reducing acne and breakouts of skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.