केस तुटण्याची खूपच सामान्य झाली आहे (Hair Care Tips). लहान मुलांपासून,मोठ्यापर्यंत सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागतो जर तुम्हाला हेअर फॉलचा त्रास कायमचा दूर करायचा असेल तर अभिनेत्री रविना टंडननं सांगितलेला हा उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. केस गळणं केस तुटण्याच्या समस्येनं आजकाल प्रत्येकजण त्रस्त असतो. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या समस्या, ताण-तणाव यांसह इतर गोष्टींचा यात समावेश असतो. हेअर फॉलच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक हजारो रुपयांची उत्पादनं विकत घेतात महागड्या ट्रिटमेंट्स करतात पण तरीही फरक दिसून येत नाही. (Raveena Tandon shares 1 special remedy For Hair Growth)
केस गळणं टाळण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडननं एक घरगुती उपाय सांगितला आहे.हा उपाय करून तुम्ही आपल्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. रविना टंडननं एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तिनं सांगितलं होत की आवळ्याशी संबंधित घरगुती उपाय केल्यास तुम्ही हेअर फॉल टाळू शकता.
रविना व्हिडिओत सांगते की आजकाल प्रत्येकालाच ही समस्या असते की, केस खूपच गळत आहे. ताण-तणाव, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे केस खूपच गळू लागतात. केसांना मजबूत बनवण्यासाठी आवळ्यापेक्षा चांगला उपाय नाही. तुमचे केस पातळ असतील किंवा खूपच गळत असतील तर तुम्ही रोज आवळा खाऊ शकता किंवा केसांच्या मुळांवर आवळ्याचा वापर करू शकता.
रवीना सांगते की जवळपास ६ आवळे एक कप दुधात उकळवून घ्या. जेव्हा आवळे मऊ होतील तेव्हा त्यातल्या बिया काढून दुधात आवळ्याचा पल्प घालून व्यवस्थित मॅश करून घ्या. अभिनेत्रीनं ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून मालिश करण्याचा सल्ला दिला आहे. तिनं सांगितलं की ही पेस्ट केसांना १५ मिनिटं लावून ठेवा नंतर कोमट पाण्यानं केस व्यवस्थित धुवा.
रवीना सांगते की हा उपाय केल्यानंतर तुम्हाला शॅम्पूची गरज भासणार नाही. आवळ्यातील एसिडिक तत्व केसांतील घाण काढून टाकतील आणि केसांना मुलायम बनवतील. आठवड्यातून २ वेळा केसांना ही पेस्ट लावल्यानं काही महिन्यातच केसांमध्ये सुधारणा झालेली दिसून येईल.