बॉलिवूडची बबली गर्ल राणी मुखर्जी आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करते. 'गुलाम'मधील खट्याळ मुलगी असो किंवा 'मिसेस चॅटर्जी'मधील कणखर आई, राणीने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय.(Rani Mukerji beauty secret) पण अभिनयासोबतच चर्चा असते ती तिच्या 'ग्लोइंग स्किन'ची आणि दाट केसांची. वयाची ४७ व्या वर्षी देखील तिचा चेहरा एखाद्या विशीतल्या तरुणीसारखा दिसतो.(Rani Mukerji skincare routine)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राणीने आपल्या या 'एव्हरग्रीन' लूकचे श्रेय कोणत्याही महागड्या क्रीमला नाही, तर चक्क आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एका पारंपरिक पदार्थाला दिलं आहे. राणीच्या मते, हा पदार्थ तिच्यासाठी एखाद्या जादूसारखा (Magic) काम करतो. (celebrity beauty secrets India)
फेसपॅक लावताना ३ चुका करतात चेहरा कायमचा खराब, सुरकुत्याही वाढतात! म्हाताऱ्या दिसताय तुम्ही..
ती म्हणते की मी फक्त त्वचेला नारळाचे तेल लावते. रासायनिक उत्पादनांपेक्षा नैसर्गिक गोष्टींवर जास्त विश्वास ठेवायला हवा. माझ्यासाठी नारळाचं तेल हे केवळ स्वयंपाकघरातील तेल नाही, तर ते एक औषध आहे जे माझ्या त्वचेवर आणि केसांवर जादू करतं, असं ती सांगते. शूटिंगच्या निमित्ताने सतत होणारा मेकअप आणि केसांवर होणारे हिटिंग प्रयोग यांपासून वाचण्यासाठी मी वर्षानुवर्षे हाच पारंपरिक उपाय करते आहे.
मी ज्या भागात राहते त्या भागत हवा आणि प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होते आहे. किनारपट्टीच्या भागात वाढल्यामुळे त्वचेसाठी आणि केसांसाठी नारळाचे तेल फायदेशीर आहे. ती असं ही म्हणते प्रत्येकाची स्किन वेगळी आहे, त्यामुळे हवामान आणि त्वचेच्या पोत बदलल्यामुळे त्वचेची काळजी घ्यायला हवी.
नारळ तेल हे जगातील सगळ्यात चांगले मेकअप रिमूव्हर आहे. दिवसाभराचे शूटिंग संपल्यानंतर ती महागड्या क्लिंजिंग ऑईलऐवजी शुद्ध नारळ तेलाने आपला मेकअप काढते. यामुळे केवळ मेकअपच निघत नाही, तर त्वचेला आवश्यक असलेले पोषणही मिळते. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर नारळ तेलाचा हलका मसाज करते, ज्यामुळे तिची त्वचा हायड्रेटेड राहते आणि सकाळी उठल्यावर चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसतो. केसांसाठी देखील ती नारळाचे तेल लावते. या साध्या-सोप्या उपायांनी ती स्वत:ची काळजी घेते.
