Join us

रंग खेळायला जाल पण केसांचे काय? ५ गोष्टी विसरला तर वर्षभर केस राहतील खराब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2023 15:34 IST

Protect Your Hairs From Holi Colours, With these Easy Tips! होळी खेळण्यापूर्वी केसांची योग्य काळजी घ्या, यासाठी ५ टिप्स आपल्याला मदत करतील..

रंगीबेरंगी रंग, उत्साह, डान्स, पुरणाची पोळी, या सर्व गोष्टींचे कॉम्बिनेशन म्हणजे होळी. भारतात या सणाला फार महत्व आहे. 'होली है भाई होली है, बुरा ना मानो होली है' असं म्हणत आपल्या चेहऱ्याला रंग लावणारे बरेच जण असतात. हा रंग केसांवर देखील पडतो. केमिकलयुक्त रंग आपल्या त्वचेवर व केसांवर थेट परिणाम करतात. ज्यामुळे केसांना इजा पोहोचण्याची दाट शक्यता असते.

रंग केसांवर पडल्यानंतर केस गळणे, कमजोर व निस्तेज होतात. त्यामुळे होळी खेळण्यापूर्वी केसांची काळजी कशी घ्यावी याची माहिती जाणून घ्या(Protect Your Hairs From Holi Colours, With these Easy Tips!).

होळी खेळण्यापूर्वी केसांना मास्क लावा

होळीच्या एक-दोन दिवस आधी, केसांवर हेअर मास्क लावा. यामुळे केसांच्या रंगावर त्याचा परिणाम होणार नाही. मास्कमुळे केस आतून मजबूत राहतील, व रंगाचा थेट परिणाम केसांवर होणार नाही.

केसांवर तेल चांगले लावा

होळी खेळण्यापूर्वी केसांना चांगले तेल लावा. केसांवर तेलाने मसाज केल्याने त्यावर रंग लागणार नाही, ज्यामुळे केस सुरक्षित राहतील. होळीच्या एक दिवस आधी केसांना तेल लावल्याने लॅमिनेशन तयार होईल. यासाठी आपण मोहरीचे तेल, बदाम तेल किंवा खोबरेल तेलाचा वापर करू शकता. यातील पोषक घटक तुमचे केस सुरक्षित ठेवतील.

केसांना तेल लावायलाच हवे का? तेल लावल्याने केस सुंदर होतात की जास्त गळतात? - पाहा खरं काय..

तेल लावल्यानंतर हे काम करा

होळी खेळण्यापूर्वी तेल लावत असाल तर, मसाज केल्यानंतर टॉवेल गरम करून पाण्यात भिजवा. आता हा टॉवेल दहा मिनिटे डोक्यावर बांधून ठेवा. यामुळे तुमच्या डोक्यात तेल जमा होईल, व रंगाचा केसांवर दुष्परिणाम होणार नाही.

केस कंडिशनिंग करा

होळीपूर्वी केसांचे कंडिशनिंग नीट करा. यासाठी केसांवर शॅम्पूनंतर कंडिशनर लावा. आपण कोरफड, बदाम तेल, खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. कंडिशनिंगमुळे केस दीर्घकाळ सुरक्षित राहील.

महागडे सिरम-टोनर कशाला? चेहऱ्यावर ग्लो हवा तर वापरा भिजवलेल्या तांदूळाचं पाणी, पाहा जादू

डोक्यावर स्कार्फ बांधा

जर आपण होळी खेळताना तेल लावायला विसरला असाल तर, केसांचे पोनीटेल बनवा आणि केसांना स्कार्फ बांधा. होळी खेळताना केस खुले ठेवले तर केस निर्जीव होऊ शकतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोळी 2022