उन्हाळ्यात आपल्याकडे एवढं ऊन असतं की त्याचा परिणाम त्वचेवर होताेच. ज्या लोकांना घराबाहेर जावं लागतं त्यांना बऱ्याचदा सन बर्नचाही त्रास होतो आणि टॅनिंगही होतं. ज्यांना उन्हात बाहेर पडावं लागत नाही त्यांनाही या दिवसांंत खूप टॅनिंग होतं. त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन वाढलं की मग त्वचेवरचा ग्लो जातो. त्वचा छान फ्रेश, तुकतुकीत दिसत नाही. म्हणूनच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधू चोप्रा या दिवसांत एक खास घरगुती उपाय करतात. उन्हाळ्यात त्वचेला लावण्यासाठी त्या एक खास घरगुती उटणं तयार करतात आणि तेच नियमितपणे लावतात. यामुळे टॅनिंग, डेडस्किन कमी होते आणि त्वचेवर कायमच एक छान चमक राहाते. आता ते उटणं कसं तयार करायचं ते पाहुया...(Priyanka Chopra's mother shared home hacks for glowing skin in summer)
उन्हाळ्यात त्वचेसाठी प्रियांका चोप्राच्या आईने सांगितला खास घरगुती उपाय
मधू चोप्रा यांनी याविषयीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की त्यांनी आजवर त्यांच्या चेहऱ्याला कधीच विकतचे फेसवॉश किंवा साबण लावलेला नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी त्यांचा भर फक्त आणि फक्त घरगुती पदार्थांवर आणि आपल्या जुन्या पारंपरिक उपायांवर असतो.
उन्हाळ्यात शरीराला घामाचा उग्र वास येऊन चारचौघांत लाज वाटते? दुर्गंधी कमी करण्यासाठी ५ टिप्स
आता त्यांनी जे उटणं तयार करायला सांगितलं आहे ते देखील यापैकीच आहे. हे उटणं तयार करण्यासाठी सगळ्यात आधी तर एका वाटीमध्ये २ चमचे बेसन घ्या.
त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. त्वचेला छान ग्लो हवा असेल तर हळद हवीच. आणि टॅनिंग, डेडस्किन काढून टाकण्यासाठी बेसन अगदी उत्तम आहे. आता या पिठामध्ये थोडंसं दही घाला.
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा साय घाला. आता हे सगळं व्यवस्थित हलवून एकत्र करा. हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा.
त्यानंतर साधारण १२ ते १५ मिनिटांनी लेप अर्धवट सुकत आला की हलक्या हाताने चोळून लेप काढून टाका.
पनीरमधलं प्रोटीन कमी करणाऱ्या ५ चुका, पनीरचे पदार्थ करताना तुमचंही 'हे' चुकतंय का पाहा
या लेपासोबतच तुमच्या त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन, घाण, मळ असं सगळं निघून जाईल आणि त्वचेला छान मऊपणा, चमक येईल. यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि माॅईश्चराईज करा. बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये किती छान बदल झालेला असेल.
Web Summary : Madhu Chopra shares her summer skincare secret: a homemade face pack. It uses besan, turmeric, and yogurt to combat tanning and dead skin, revealing radiant skin. Apply for 15 minutes, scrub gently, and moisturize.
Web Summary : मधु चोपड़ा ने गर्मी में त्वचा की देखभाल का रहस्य बताया: बेसन, हल्दी और दही से बना फेस पैक। यह टैनिंग और डेड स्किन को हटाकर त्वचा को चमकदार बनाता है। 15 मिनट लगाएं, धीरे से स्क्रब करें, और मॉइस्चराइज़ करें।