Join us

त्वचेवर सुरकुत्या, एजिंगच्या खुणा नको ! प्रियांका चोप्रा लावते तिच्या आजीने सांगितलेली एक खास गोष्ट...पाहा तिचे ब्यूटी सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2025 09:48 IST

She passed at 94 with barely 3 wrinkles’: Priyanka Chopra shares her grandmother’s beauty secrets and philosophies : Priyanka Chopra's skincare secret : Priyanka Chopra shares her grandmother’s beauty secrets : प्रियांकाने तिच्या आजीच्या त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी करण्याचे सिक्रेट सांगितले आहे....

प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून आपण सगळेच ओळखतो. बॉलिवूडची देसी गर्ल आपल्या ड्रेसिंग स्टाईल आणि फिटनेसमुळे सारखी चर्चेत असते. प्रियांका फिट राहण्यासाठी जितकी आपल्या शरीराची काळजी घेते तितकीच काळजी ती आपल्या स्किनची देखील घेते. स्किन चांगली राहण्यासाठी ती स्किन रुटीन आवर्जून फॉलो करताना दिसते( Priyanka Chopra shares her grandmother’s beauty secrets).

एवढंच नाही तर ही देसी गर्ल फक्त नावालाच देसी गर्ल नसून ती त्वचेसाठी खास देसी आणि घरगुती उपाय करते. प्रियांकाचे स्किनकेअर रुटीन अत्यंत साधे असून ती नैसर्गिक उपाय करण्याला पसंती देते. प्रियांका कायमच इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या आईने खास तिला सांगितलेले ब्यूटी सिक्रेट शेअर करत असते. नुकतेच प्रियांकाने तिच्या आजीचे एक खास ब्यूटी सिक्रेट शेअर केले आहे(Priyanka Chopra's skincare secret).

आपल्या आजीचे ब्यूटी सिक्रेट शेअर करताना प्रियांका म्हणते, " माझी आजी वयाच्या ९४ व्या वर्षी गेली आणि तेव्हा तिच्या त्वचेवर फक्त तीनच सुरकुत्या होत्या". असं सांगत प्रियांकाने तिच्या आजीचे त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी करण्याचे सिक्रेट (She passed at 94 with barely 3 wrinkles’: Priyanka Chopra shares her grandmother’s beauty secrets and philosophies) सांगितले आहे. प्रियांकाच्या आजीचे काय आहे ते नेमकं ब्यूटी सिक्रेट ते पाहूयात. 

मेहेंदी लावली की केस लाल-तांबडे दिसतात? ५ सोपे उपाय, केस दिसतील सुंदर कलर केल्यासारखे...

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा-उदास दिसतो? ७ नैसर्गिक पदार्थ लावा, चेहऱ्यावर येईल तरुण चमक...

प्रियांका चोप्राने तिच्या आजीबद्दल सांगितले की, तिच्या काळात त्वचेची काळजी घेण्यासाठी आजी कोणतेही महागडे क्रीम्स किंवा औषधं वापरत नसे. वयाच्या ९४ व्या वर्षी देखील आजीच्या त्वचेवर फक्त तीनच सुरकुत्या होत्या. तिच्या या सुंदर त्वचेचं गुपित दुसरं - तिसरं काही नसून चक्क 'खोबरेल तेल' होत. 

प्रियांका चोप्रा सांगते, आजी संपूर्ण त्वचेवर खोबरेल तेल लावायची. त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी आणि उतरत्या वयातही त्वचा लूज पडू न देता किंवा त्वचेवर एजिंगच्या खुणा न दिसण्यासाठी खोबरेल तेल आहे असरदार... 

केसांना लावा विड्याच्या पानांचा हेअरमास्क, हिरवीगार पानं करतील जादू - केसांच्या समस्या राहतील दूर...

एजिंगच्या खुणा लपवण्यासाठी खोबरेल तेल कसं फायदेशीर आहे ?

१. खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चराइज करतं, ज्यामुळे त्वचा मऊ, कोमल आणि तजेलदार राहते.

२. खोबरेल तेलात फॅटी अ‍ॅसिड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेला पोषण देतात आणि एजिंगच्या खुणा व सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. 

३. खोबरेल तेलामुळे त्वचेला खोलवर हायड्रेशन मिळते. त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. 

त्वचेसाठी खोबरेल तेल वापरताना लक्षात ठेवा... 

१. त्वचेसाठी खोबरेल तेल वापरताना शुद्ध, ऑर्गेनिक वर्जिन खोबरेल तेल वापरणं अधिक फायदेशीर ठरतं.

२. फार ऑइली त्वचा असेल, तर वापराचं प्रमाण कमी ठेवा आणि वेळोवेळी त्वचा स्वच्छ धुवून साफ करा.

३. आठवड्यातून किमान ४ ते ५ वेळा हा उपाय केल्यास त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीप्रियंका चोप्राहोम रेमेडी