Join us

देसी गर्ल प्रियांका चोप्रा सांगतेय २ नुस्के! त्वचा होईल तिच्यासारखी ग्लोईंग आणि ओठ होतील गुलाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 11:40 IST

Priyanka Chopra Shares Her Beauty Tips: सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रियांका चोप्रा कोणते घरगुती उपाय करते याविषयीची माहिती तिने स्वत:च एकदा एका मुलाखतीत दिली होती.(how to get rid of black lips, tanning and dead skin?)

ठळक मुद्देप्रियांकाने तिला आवडत असलेले काही घरगुती सौंदर्योपचार सांगितले आहेत. ते उपाय नेमके कोणते ते पाहूया..

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची ओळख आता फक्त बॉलीवूडपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. हॉलीवुडमध्येही तिने आता तिचं स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. प्रियांका चोप्रा ही खरोखरच देसी गर्ल आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण इतर कोणत्याही महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेण्यापेक्षा तिचा विश्वास पारंपरिक पद्धतीने सौंदर्य खुलवण्यावर आहे. प्रियांकाची आई मधू चोप्रा या सुद्धा नेहमीच घरगुती उपाय करून त्वचेचे, केसांचे सौंदर्य कसे खुलवता येऊ शकते, याविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतात (home remedies). काही महिन्यांपुर्वी Vogue India यांनी प्रियांकाची मुलाखत घेतली होती (Priyanka Chopra Shares Her Beauty Tips). यामध्ये तिने तिला आवडत असलेले काही घरगुती सौंदर्योपचार सांगितले आहेत. ते उपाय नेमके कोणते ते पाहूया..(how to get rid of black lips, tanning and dead skin?)

सौंदर्य खुलविण्यासाठी प्रियांका चोप्रा करते ते घरगुती उपाय 

 

१. टॅनिंग आणि डेडस्किन काढून टाकण्यासाठी उपाय

जर तुमची स्किन खूप जास्त काळवंडली असेल तर हा एक सोपा उपाय करून बघा. डेड स्किन काढून टाकण्यासाठीही हा उपाय खूप उत्तम आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये १ कप बेसन पीठ घ्या.

खुशी कपूरने घातलेला हा महागडा ड्रेस मिळतोय फक्त ९९९ रुपयांत, आवडला असेल तर लगेच......

त्यामध्ये दही आणि कच्चं दूध घाला. १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा चंदन पावडर आणि अर्धा चमचा हळद घाला. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि चेहरा, गळा, मान, हात, पाठ असं जिथे जिथे टॅनिंग झालं असेल तिथे लावून हलक्या हाताने मसाज करा. साधारण १० मिनिटांनी त्वचा धुवून टाका. त्वचेमध्ये खूप छान फरक जाणवेल. 

 

२. ओठ काळवंडले असतील तर..

हिवाळ्यात ओठ उलण्याचा त्रास अनेक जणांना होतो. यासाठी थोडसं सी सॉल्ट घ्या. त्यामध्ये काही थेंब ग्लिसरीन आणि काही थेंब रोज वॉटर टाका.

लसूण सोलायला वेळ लागतो? फक्त २०० रुपयांचं 'हे' मशिन घ्या- काही मिनीटांतच किलोभर लसूण सोला

हे मिश्रण तुमच्या ओठांना लावून हळूहळू मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने ओठ धुवून टाका. हा उपाय काही दिवस रोज रात्री केल्यास ओठ अतिशय मुलायम आणि गुलाबी होतील.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीप्रियंका चोप्रा