अनेक वाढलेल्या समस्यांपैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे केस गळणे. कितीही काही उपाय केले तरी केस गळतातच. (Prepare this Ritha shampoo at home in ten minutes good for hair)सगळ्यांना फक्त प्रदूषण आणि दूषित पाणी कारणीभूत आहे असे वाटते. वाढलेले प्रदूषण हे एक कारण झाले आहेच, मात्र इतरही अनेक गोष्टी केसांचे आरोग्य ढासाळण्याला कारणीभूत आहेत. आजकाल चांगला आहार घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. आहार हे एक कारण आहे. ताणतणाव हा एक मोठा मुद्दा आहे. तसेच जागरण आणि बदलेली जीवनशैली इतरही कारणे आहेत.
केस धुण्यासाठी शाम्पू तर प्रत्येक जण वापरतो. मात्र अनेकदा केसांचे गळ्याचे प्रमाण चुकीच्या शाम्पूमुळे वाढते. त्यामुळे विकतचे रसायनयुक्त शाम्पू वारण्यापेक्षा घरी तयार केलेले नैसर्गिक शाम्पू वापरावेत. घरी शाम्पू करणे अगदीच सोपे आहे. त्याला चांगला फेसही येते. कारण रिठा वापरुन मस्त शाम्पू करता येतो.
साहित्य मेथी दाणे, जास्वंदीचे फुल आणि पाने, रिठा, पाणी, कोरफड
कृती१. गरम पाणी करत ठेवायचे. पाणी तापल्यावर त्यात रिठा घालायच्या. रिठा छान उकळवून घ्या. नंतर त्या हाताने चोळून त्याचा अर्क काढून घ्यायचा. पुन्हा पाणी आणि रिठांची साले उकळत ठेवा. त्यात जास्वंदीचे फुल घाला तसेच पानेही घाला.
२. त्यात थोडे मेथीचे दाणे घाला आणि उकळू द्या. त्यात कोरफडीचा अर्क घाला आणि पाणी आटून अर्धे व्हायची वाट पाहा. नंतर पाणी गाळून घ्यायचे. ते नीट गाळता येत नाही तर त्यातील चोथा हाताने काढून टाका आणि एका हवाबंद बाटलीत शाम्पू साठवून ठेवा. दोन आठवडे चांगला राहतो.
करायला अगदी सोपा आहे. तसेच जास्त सामग्रीही लागत नाही. रिठा केसांसाठी फार उपयुक्त असतात. हा शाम्पू एकदा वापरुन तर पाहा. नक्कीच फरक जाणवेल.