आपले ही केस लांब, सुंदर आणि घनदाट असावे असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. (Hair care solution) परंतु, वाढते प्रदूषण, हवामान, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताण यामुळे केसगळती मोठ्या प्रमाणात वाढते.(Ayurvedic hair care tips) इतकेच नाही तर केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळाले नाही तर ऐन तारुण्यात केस पांढरे होऊ लागतात.(Natural remedy for white hair) केस पांढरे होण्याची समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे. कितीही महागडे उत्पादने केसांना लावले तरी केस काही काळे होत नाही. (Premature white hair solution)
काही जण केसांना काळे करण्यासाठी मेहेंदीचा वापर करतात.(Herbal henna mix for hair) अनेकदा केस रंगवताना ते मुळांपर्यंत रंगत नाही. काही भागात केस पांढरे राहतात. तसेच मेहेंदीत असणारे घटक केसांना नुकसान देखील पोहचवू शकतात. त्यासाठी केसांना मेहेंदी लावताना आपण काही पदार्थ मिसळले तर केसांचे नुकसान होणार नाही.
केसांना फाटे फुटले- कोरडे झाले? घरीच करा बोटॉक्स, सोपी ट्रिक- खराट्यासारखे केस होतील मऊ-सुळसुळीत
संचित्रा मित्रा या कंटेंट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर घरगुती उपाय शेअर केला. तिने म्हटलं की, मेहेंदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनाऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास केसांना नुकसान होणार नाही. त्यासाठी मेहेंदीमध्ये जास्वंदीचा पावडर, मेथीचे दाणे, अळशी बियाणे, आवळा पावडर, कॉफी पावडर, कोरफड जेल मिक्स करा.
मेहेंदी तयार करण्यासाठी आपल्याला पॅनमध्ये पाणी गरम करुन त्यात २ चमचे जास्वंदीचा पावडर, मेथीचे दाणे, अळशीचे दाणे, आवळा पावडर आणि कॉफी पावडर घाला. आता या पाण्याला चांगले उकळवा. हे पाणी गाळून मेहेंदीच्या पावडरमध्ये घाला. कोरफड जेल घालून त्याची पेस्ट तयार करा.
ही पेस्ट केसांना जवळपास २ तास लावायला हवी. त्यानंतर केस पाण्याने धुवा. केसांवर लगेच शाम्पू वापरण्याची गरज नाही. दुसऱ्या दिवशी केसांना शाम्पू लावून केस धुवू शकता. याप्रकारे पांढरे केस काळे होण्यास मदत होतील आणि सॉफ्ट देखील होतील.