वयाच्या आधीच केस पांढरे होणे ही आजच्या काळात मुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांमध्ये दिसणारी एक मोठी समस्या झाली आहे. नैसर्गिकरीत्या वय वाढल्यावर मेलानिन नावाचे रंगद्रव्य कमी होत जाते आणि त्यामुळे केस पिकतात, पण जेव्हा हे लहानपणीच कमी होऊ लागते तेव्हा केस पटापट पांढरे होतात. या मागे अनेक कारणे असू शकतात. २० आणि २५ वर्षांच्या मुला-मुलींचे केस तर पिकतातच मात्र शाळकरी मुलांचेही केस पिकतात. १६वं वर्ष लागण्याआधीच असे केस पिकणे चांगले नाही. त्यामागील कारणे जाणून उपाय करणे गरजेचे असते. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील पोषणाची कमतरता. जीवनसत्त्व बी१२, लोह, कॉपर, झिंक आणि फॉलिक अॅसिड या घटकांची कमतरता असल्यास केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहत नाही.
लहान मुलांमध्ये प्रथिनांचा अभाव, दूध व दुग्धजन्य पदार्थ कमी प्रमाणात खाणे किंवा आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा अभाव असल्याने केस लवकर पांढरे होतात. कधी कधी ही समस्या आनुवंशिकही असू शकते, घरी जर इतरांचेही केस असेच पांढरे झाले असतील तर त्यामुळे पुढच्या पिढ्यांनाही ही समस्या सतावते. थायरॉईडचे विकार, त्वचारोग किंवा दीर्घकालीन आजार हेही कारणीभूत ठरु शकतात. शिवाय सततचा ताण, चुकीच्या आहाराच्या सवयी, जंक फूड, झोपेची कमतरता आणि प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो व केस अकाली पिकतात.
उपाय म्हणून आहारात बदल करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, सुका मेवा, दूध व दही यांचा समावेश केल्यास केसांना आवश्यक पोषण मिळते. (premature graying? hair getting white in young age, see reasons and remedies, home remedies )वेळेवर झोप घेणे, ताण कमी ठेवणे आणि नियमित व्यायाम करणे हे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. केसांना आवळा, नारळ किंवा बदाम तेलाने मालीश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि मुळांना पोषण मिळते. लहान मुलांच्या बाबतीत योग्य तपासणी करून जीवनसत्वे व मिनरल्सची पूर्तता करणे आवश्यक आहे. योग्य जीवनशैली आणि संतुलित आहारामुळे केस अकाली पांढरे होण्याची गती कमी करता येते आणि नैसर्गिक काळेपणा जास्त काळ टिकवता येतो.